नाताळनिमित्त ख्रिसमस ट्री आणि सजावटीच्या सामानानं मुंबईतील बाजारपेठा सजल्या; पाहा व्हिडिओ - सर्वात मोठा नाताळ सण
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/25-12-2023/640-480-20350211-thumbnail-16x9-market-on-christmas.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Dec 25, 2023, 11:04 AM IST
मुंबई Market on Christmas : ख्रिश्चन धर्मियांचा सर्वात मोठा नाताळ सण आज सर्वत्र उत्साहात साजरा केला जातोय. यानिमित्तानं मुंबईतील सर्व बाजार नाताळ सजावटीच्या साहित्यांनी सजल्याचं पाहायला मिळतंय. ख्रिसमस ट्री आणि ट्री सजावटीचं सामान, येशूच्या जन्माच्या देखाव्यांचे गोठे, मुखवटे, सांताक्लॉजच्या लाल टोप्या आणि सान्ताचा पेहराव यांची ग्राहकांकडून मोठी मागणी करण्यात येत आहे. अगदी 20 रुपयांपासून ते 20 हजार रुपयांपर्यंत सजावटीचं साहित्य क्रॉफर्ड मार्केट इथं उपलब्ध आहे. हिरव्या पानांचे ख्रिसमस ट्री आणि मेटॅलिक 6 हजार ते 20 हजारांचे ख्रिसमस ट्री उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे स्प्रिंग स्टॅण्ड, लाकडी स्टॅण्डवर लावलेली पिसांची झाडंही बाजारात आली आहेत. ती सजवण्यासाठी रंगीत काठ्या, चेंडू, कागदी माळा, दिव्यांच्या माळा आणि सांताक्लॉजचा ड्रेस, टोप्या इत्यादी गोष्टींनाही तेवढीच मागणी आहे. अशा वेगळ्या वेगळ्या सजावटीच्या सामानांनी क्रॉफर्ड मार्केट सजले आहे.