Tadoba Tigress Injured : माया वाघीण आढळली जखमी अवस्थेत; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात झाले दृश्य कैद - Tadoba Chandrapur
🎬 Watch Now: Feature Video
चंद्रपूर : पर्यटक ताडोबा अभयारण येथे भेट देण्यासाठी दूरवरुन येतात. तर अनेकदा सेलिब्रिटी देखील वाघोबाचे दर्शन येतात. अशातच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध वाघीण माया ही जखमी अवस्थेत आढळली. एका पर्यटकाने ही दृश्य आपल्या कॅमेरात कैद केले आहे. त्यात ती आपल्या पिलांसह लंगडत चालताना दिसत आहे. सचिन अभ्यंकर या पर्यटकाने या वाघिणीचा व्हीडिओ काढला आहे. हा व्हीडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या भानूसखिंडी-निमढेला परिसरात तीन बछड्यांसह ही वाघिण आढळून आली आहे. मायावरती लवकर उपचार करावे, अशी मागणी ताडोबा व्यवस्थापनाकडे करण्यात आली आहे. तसेच ताडोबा व्यवस्थापन या जखमी वाघिणीवर लक्ष ठेऊन आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प येथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे.