ETV Bharat / entertainment

राखी सावंतच्या स्वागतासाठी पाकिनी स्ताअभिनेत्री हानिया आमिर विमानतळावर, फोटो पाहून व्हाल थक्क... - HANIA AAMIR AND RAKHI SAWANT

पाकिस्तानी सुंदर अभिनेत्री हानिया आमिरचा एक फोटो चर्चेत आला आहे, यामध्ये ती विमानतळाबाहेर कार्डबोर्ड घेऊन राखीजी सावंतची वाट पाहाताना दिसत आहे.

Rakhi Sawant and Rakhi Sawant
राखी सावंत आणि हानिया आमिर (Rakhi Sawant and Rakhi Sawant Photo - (instagram - ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 10, 2025, 4:51 PM IST

मुंबई - बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही नेहमीच चर्चेत असते. राखी सावंतची चर्चा केवळ देशातच नाही तर देशाबाहेरही होते. आजकाल राखी तिच्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. अलीकडेच राखीनं सांगितलं होतं की, ती पाकिस्तानी 'इन्स्पेक्टर' म्हणजेच अभिनेता दोदी खानशी लग्न करणार आहे. यानंतर दोदी खाननं एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यानं सांगितलं होत की तो, राखी सावंतशी लग्न करू शकत नाही. दोदी खाननं असंही म्हटलं होतं की, तो राखीसाठी नक्कीच मुलगा शोधेल. दरम्यान एक पाकिस्तामधील सुंदरी अभिनेत्री राखीचे स्वागत करण्यास उत्सुक असल्याची दिसत. ही सुंदरी दुसरी तिसरी कोणी नसून पाकिस्तानी नाट्यसृष्टीतील टॉप अभिनेत्री हानिया आमिर आहे.

राखींन हानियाचं केलं कौतुक : काही दिवसांपूर्वीच राखी सावंतनं हानिया आमिरचं कौतुक केलं होतं. राखीच्या या विधानाची चर्चा सोशल मीडियावर खूप रंगली होती. आता हानियानेही राखी सावंतवर तिचे प्रेम दाखवले आहे. तिनं राखीसाठी असं काहीतरी केलं, जे पाहून ड्रामा क्वीनला नक्कीच आनंद होईल. हानिया आमिरचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये, हानियाच्या हातात कार्डबोर्ड असल्याचं दिसत आहे आणि ती याला घेऊन विमानतळाबाहेर आहे. या कार्डबोर्डवर असं लिहिलं आहे, 'राखी जी, मी इथे आहे.'आता या फोटोच्या पोस्टमध्ये एका यूजरनं लिहिलं, 'हानिया रॉक राखी शॉक.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'हानिया राखीची वाट विमातळावर पाहात आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'तुझ्यात आणि राखी सावंतमध्ये थोडाही फरक आहे.' याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

राखीला घेण्यासाठी हानिया विमानतळावर गेली : आता हानियाचा हा अंदाज पाहून अनेकजण तिला राखीबद्दल देखील विचारत आहे. आता राखी पाकिस्तानला जाते की, नाही हे पाहणं लक्षणीय असणार आहे. राखीनं अलीकडेच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, यामध्ये ती लाल सूटमध्ये घालून फ्लाइटमध्ये असल्याची दिसली होती. राखीला पाहून एका प्रवाशानं सांगितलं की, त्याला तिच्यासाठी एक गाणं म्हणायचं आहे. हे ऐकून राखी म्हटलं होत- 'गा'. यानंतर तो प्रवासी गाणं म्हणू लागतो. तसेच गाण्यामधील बोल बदलतो. गाणे ऐकल्यानंतर, राखी प्रवाशाला ढकलते. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत होता.

हेही वाचा :

  1. पाकिस्तानी अभिनेता दोदी खाननं राखी सावंतबरोबर लग्न करण्यास दिला नकार, जाणून घ्या कारण...
  2. राखी सावंत पाकिस्तानची सून बनणार, 'या' पोलिस अधिकाऱ्याशी करणार लग्न
  3. ड्रामा क्वीन राखी सावंत 'बिग बॉस मराठी 5'मध्ये घेणार एन्ट्री - निक्की तांबोळीचा वाजणार बॅन्ड - bigg boss marathi 5

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.