Maratha Sena Sangh: राज्यातील मंदिरातील ब्राह्मण पुजारी हटवा; पुरुषोत्तम खेडेकरांची मागणी - Purushottam Khedekar
🎬 Watch Now: Feature Video

बुलडाणा: काळाराम मंदिरामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज असलेल्या संयोगिताराजे भोसले यांच्यासोबत जो प्रकार घडला त्याचा निषेध मराठा सेवा संघ करत असल्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटले आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरास संयोगीताराजे छत्रपती यांनी भेट दिली होती. यावेळी संयोगीताराजे छत्रपती यांनी मंदिरात पूजा केली हेती. मात्र या पूजेवरून वाद निर्माण झाला होता. त्यांनी महंतांना पूजा वेदोक्त पद्धतीने करण्यास सांगितले. त्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. या पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे. आता या वादात मराठा सेवा संघाने देखील उढी घेतली आहे. नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज असलेल्या संयोगिताराजे भोसले यांच्यासोबत जो प्रकार घडला त्याचा निषेध मराठा सेवा संघ करत असल्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटले आहे.