Maratha Reservation Protest : शरद पवारचं मराठा आरक्षणाचे हिटलर - आरक्षण अभ्यासक नामदेव जाधवांचा हल्लाबोल - मराठा आरक्षणाचे हिटलर
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 10, 2023, 11:54 AM IST
|Updated : Nov 10, 2023, 2:46 PM IST
पुणे Maratha Reservation Protest : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उभं केलेल्या आंदोलनानं पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परंतु मराठा आरक्षणाचे हिटलर हे शरद पवार असल्याचं मत आरक्षण प्रश्नाचे अभ्यासक प्राध्यापक नामदेव जाधव यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे मराठ्याचे नेते म्हणून दिल्लीत वावरतात आणि राज्यात फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन राजकीय फायदा घेतात. शरद पवार हे मराठा नेते नाहीत, तर शरद पवार हे ओबीसी नेते आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात ओबीसी असा उल्लेख आहे. त्यामुळे 1994 ला शरद पवारच मुख्यमंत्री होते. त्यांनीच मराठ्यांचं सोळा टक्के आरक्षण देत ओबीसींचा 50 टक्के कोटा पूर्ण केला. हे मराठ्यांच्या लक्षात आलंच नाही. त्यामुळे शरद पवारचं मराठ्यांच्या आरक्षणाचे जनरल डायर आहेत, असा आरोप नामदेव जाधव यांनी केला आहे.
मराठा जात नसून कुणबी ही मूळ जात : मराठा समाज मुळातच 'कुणबी' आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावून देशासाठी लढा असं सांगितलं. त्यात मराठा युद्धात सहभागी झाले. त्यामुळे मराठा जात नसून 'कुणबी' ही मूळ जात आहे. हेच समजायला मला पन्नास वर्षे गेली. 50 वर्षांत मराठा नेता म्हणणाऱ्या शरद पवारांनी आरक्षणाची वाट लावली. त्यामुळे ते आरक्षणाचे खरे जनरल डायर आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला.