Man Swallowed Notes : या पठ्ठ्याने लाच घेतलेल्या नोटा पोलिसांसमोरच गिळल्या!, Watch Video - लाच खाल्ली
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/25-07-2023/640-480-19093591-thumbnail-16x9-swalloednotes.jpg)
कटनी, मध्य प्रदेश : अरे बघा त्याने लाच खाल्ली. असे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असेल. मात्र आता मध्य प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कटनी जिल्ह्यात तैनात असलेल्या तलाठ्याला लोकायुक्तांच्या पथकाने लाच घेताना रंगेहात पकडले असता, तलाठ्याने लाचेची रक्कम चक्क तोंडात टाकून चक्क खाऊन टाकली! जबलपूर लोकायुक्तांच्या म्हणण्यानुसार, कटनी जिल्ह्यातील बिल्हारी येथे तैनात तलाठी गजेंद्र सिंह यांनी तक्रारदाराकडे एका जमिनीच्या प्रकरणात 5,000 रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर लोकायुक्त जबलपूर यांच्या पथकाने बिल्हारी येथे पोहोचून गजेंद्र सिंग याला ४५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. अटक होताच त्याने त्या नोटा तोंडात टाकून चावण्यास सुरुवात केली. लोकायुक्त टीमने त्याच्या तोंडातून नोट काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्यांना नोटा काढण्यात अपयश आले. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. जिथे खूप प्रयत्नानंतर त्या नोटा अखेर बाहेर काढण्यात आल्या.