Manipur Violance : मणिपूर घटनेचा निषेध; ठाण्यात स्वतःचे केस कापून महिलांचे आंदोलन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 22, 2023, 5:28 PM IST

ठाणे : मणिपूर येथील तीन महिलांवरील सामूहिक अत्याचार आणि नग्न धिंड काढल्याचा संतापजनक व्हिडिओ समोर आला. यामुळे देशात संतापाची लाट पसरली आहे. या घृणास्पद घटनेचा निषेध करण्यासाठी आज ठाण्यातील मानपाडा येथे महिला काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. काँग्रेस प्रदेश सचिव शिल्पा सोनोने यांनी स्वतःचे केस कापून सरकारचा निषेध केला. मणिपूरमधील हिंसाचाराची आग शमण्याचे चिन्ह दिसत नसताना, आता ४ मे रोजीचा संतापजनक व्हिडिओ समोर आल्याने, संपूर्ण देशात संतापाचे वातावरण पसरले आहे. एका समुदायाने विरोधी समुदायाच्या महिलांवर सामूहिक अत्याचार करत नग्न धिंड काढण्याचा अत्यंत निंदनीय व्हिडिओ समोर आला, यामुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. मानपाडा येथे आज महिला प्रदेश काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. प्रदेश काँग्रेस सचिव शिल्पा सोनोने यांनी चक्क आपले केस कापले व भर पावसात रस्त्यावर लोळून घटनेचा निषेध व्यक्त केला. एवढे अमानवीय प्रकार करणाऱ्या नराधमांना फाशी द्यावी अशी मागणी, यावेळी करण्यात आली. तसेच मोदी सरकार आणि मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत निषेध करण्यात आला. 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.