सिडनी Coach Replaces as Player : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये एक अनोखी घटना पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेत डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सिडनी थंडर संघानं आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. खरं तर, आतापर्यंत वॉर्नर ज्याच्या कोचिंगखाली सामने खेळत होता, त्याला आता खेळाडू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. एकाच वेळी अनेक खेळाडूंच्या दुखापती हे त्यामागचं कारण आहे. सिडनी थंडर सध्या कठीण काळातून जात आहे. संघातील 5 खेळाडू संघाबाहेर आहेत. यात चार खेळाडू जखमी झाले आहेत. तर 19 वर्षांचा युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टन्स भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत होता.
Squad is in for tomorrow’s clash against @HeatBBL for the Road Safety Cup 🏆
— Sydney Thunder (@ThunderBBL) January 5, 2025
The partnership between TfNSW, Thunder, Transport and Main Roads QLD, and @HeatBBL highlights the shared commitment to reducing road trauma. pic.twitter.com/5Skv3TdWkM
41 वर्षांचा प्रशिक्षक बनला खेळाडू : माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅन ख्रिस्टीयन गेल्या दोन सत्रांपासून सिडनी थंडरसोबत सहाय्यक प्रशिक्षक म्हणून जोडला गेला आहेत. मात्र अचानक 5 खेळाडू बाहेर पडल्यानं त्याचा बदली म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. हा 41 वर्षांचा अष्टपैलू खेळाडू प्रशिक्षकापासून खेळाडू होण्यासाठी खूप उत्सुक आहे. पुढील सामन्यात तो सिडनी संघाकडून खेळण्यासाठी उपलब्ध असेल. तो यापुढंही संघाला प्रशिक्षण देणार आहे. म्हणजेच तो एकाच वेळी प्रशिक्षक आणि खेळाडूची भूमिका बजावेल.
कधी खेळला होता शेवटचा सामना : ख्रिस्टीयननं बीबीएलमध्ये शेवटचा सामना 2022-23 हंगामात ब्रिस्बेन हीटविरुद्ध खेळला. योगायोगानं यावेळीही त्यांचा सामना त्याच संघाशी होणार आहे. फ्रँचायझीच्या महाव्यवस्थापकांनी पुन्हा खेळण्यासाठी तयार झाल्याबद्दल त्याचे आभार मानले आहेत. दुसरीकडे, ख्रिस्टीयन म्हणाला की तो इतर लीगमध्ये भाग घेत आहे. जर त्यांनी प्रशिक्षणही घेतलं तर त्याच्यासाठी फार कठीण जाणार नाही.
🚨 BREAKING NEWS 🚨@ThunderBBL 41-year-old assistant coach Dan Christian has been signed as a replacement player 😲 pic.twitter.com/ll81XorRuR
— 7Cricket (@7Cricket) January 5, 2025
दुखापतींनी भरलेला सिडनी संघ : सिडनी थंडर संघात लेगस्पिनर म्हणून खेळणारा तनवीर संघा हा साइड स्ट्रेनच्या दुखापतीनं त्रस्त आहे. तर जेसन संघाला बायसेप्सची दुखापत झाली आहे. तसंच डॅनियल सॅम्स दुखावल्यामुळं संघाबाहेर आहे. याशिवाय गेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना कॅमेरुन बॅनक्रॉफ्टचं नाक तुटलं होतं. याशिवाय कॅच पकडण्याच्या प्रयत्नात त्याच्या खांद्यालाही गंभीर दुखापत झाली. सॅम कॉन्स्टास भारताविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भाग घेत होता. त्यामुळं तोही संघासोबत नव्हता.
हेही वाचा :