ETV Bharat / technology

Redmi 14C 5G आज परवडणाऱ्या किमतीत लाँच होणार, ड्युअल कॅमेरा सेटअपसह मोठी बॅटरी - REDMI 14C 5G

Redmi 14C 5G आज भारतात लॉंच होणार आहे. या फोनमध्ये मागील डिव्हाइसच्या तुलनेत डिझाइन भिन्न आहे. यात ड्युअल कॅमेरा सेटअपसह मागील पॅनलवर गोलाकार बेट आहे.

Redmi 14C 5G
Redmi 14C 5G (Redmi)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 6, 2025, 10:19 AM IST

हैदराबाद : आज एक नवीन 5G स्मार्टफोन तुमच्यासाठी भारतीय बाजारपेठेत धमाकेदार एंट्री करेल. जर तुम्ही देखील बजेट सेगमेंटमध्ये नवीन 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही Redmi आज लॉंच होणारा फोन खरेदी करु शकता. Redmi 14c 5G फोनची किंमत अधिकृत लॉंचपूर्वी लीक झाली होती आणि कंपनीनं या फोनमध्ये उपलब्ध असलेल्या खास वैशिष्ट्यांची खात्री देखील केली आहे. लॉंच झाल्यानंतर हा फोन Mi.com व्यतिरिक्त Flipkart आणि Amazon वरून खरेदी करता येईल.

Redmi 14C 5G ची भारतातील किंमत (अपेक्षित) : अलीकडेच, टिपस्टर अभिषेक यादव यांनी या रेडमी फोनच्या किंमतीशी संबंधित तपशील लीक केली होती. लीकनुसार, या फोनच्या 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 13 हजार 999 रुपये असू शकते. लीकमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की बँक ऑफरनंतर हा फोन 10 हजार 999 रुपये किंवा 11 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. जर हा Redmi फोन या किंमतीच्या श्रेणीमध्ये लॉंच केला गेला, तर हा फोन Vivo T3x 5G आणि Motorola G45 5G फोनशी स्पर्धा करेल. Vivo फोनची किंमत 12 हजार 499 रुपयांपासून सुरू होते आणि Motorola फोनची किंमत 12 हजार 999 रुपयांपासून सुरू होते.

Redmi 14C 5G तपशील (पुष्टी) : Xiaomi च्या अधिकृत साइटवर या आगामी फोनसाठी एक वेगळे पेज तयार करण्यात आलं आहे. ज्यामुळं लॉंचपूर्वी फोनच्या काही खास वैशिष्ट्यांची पुष्टी करण्यात आली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट mi.com नुसार, या फोनमध्ये ड्युअल सिम 5G सपोर्ट मिळेल. याशिवाय 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.88 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. मल्टीटास्किंगसाठी 4 एनएम-आधारित क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जनरेशन 2 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

पॉवरफुल बॅटरी : या फोनला 5,160mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे, तुम्हाला कंपनीकडून फोनच्या रिटेल बॉक्समध्ये 33-वॉटचा फास्ट चार्जर मिळेल. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा उपलब्ध असेल. या फोनला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP52 रेटिंग देखील मिळाली आहे.

हे वाचलंत का :

  1. Samsung Galaxy S25 Ultra लवकरच लॉंच होणार, अपेक्षित किंमत, डिझाइन, वैशिष्ट्ये जाणून घ्या...
  2. Moto G05 7 जानेवारीला लॉंच होणार, फोटोग्राफीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप
  3. 4000mAh बॅटरी आणि 8-मेगापिक्सेल कॅमेरा असलेला HMD चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉंच

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.