केपटाऊन Highest Opening Stand : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊन इथं सुरु आहे. यात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 615 धावांचा डोंगर उभारला. यानंतर पाकिस्तानी संघ पहिल्या डावात केवळ 194 धावा करु शकला आणि त्यांना फॉलोऑन खेळावा लागला.
.@babarazam258 and @shani_official become the first Asian opening pair to have a 200-plus partnership in South Africa 🤝
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 5, 2025
Babar is dismissed after a solid 81 🏏#SAvPAK pic.twitter.com/50Em4u6xri
दुसऱ्या डावात विक्रमी फलंदाजी : पण दुसऱ्या डावात पाकिस्तानचे फलंदाज वेगळ्याच इराद्यानं फलंदाजीसाठी उतरले. शान मसूद आणि बाबर आझम अशी फलंदाजी करतील, याची कोणालाच अपेक्षा नव्हती. सलामी देताना दोन्ही फलंदाजांनी 205 धावांची विक्रमी भागीदारी केली. जी फॉलोऑन मिळाल्यावर सर्वाधिक सलामीची भागीदारी ठरली. या खेळाडूंच्या भागीदारीमुळंच पाकिस्तानी संघ संकटावर मात करण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरला आहे. पाकिस्ताननं तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 गडी गमावून 213 धावा केल्या असून अद्यापही ते 208 धावांनी पिछाडीवर आहे.
Skipper @shani_official's unbeaten century drives Pakistan's defiance in the second innings 🏏#SAvPAK pic.twitter.com/SwlbZbz4JG
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 5, 2025
बाबर आझम आणि शान मसूद यांची विक्रमी भागीदारी : पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात शान मसूद आणि बाबर आझम यांनी अप्रतिम फलंदाजी केली. दोन्ही खेळाडू पाकिस्तानी संघासाठी सलामीला आले आणि अगदी सुरुवातीपासूनच ते क्रीजवर स्थिरावले. शान आणि बाबरनं 205 धावांची भागीदारी करुन इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेत कसोटी क्रिकेटमध्ये 200 हून अधिक धावांची भागीदारी करणारी ही पहिली पाकिस्तानी सलामी जोडी आहे. या दोघांपूर्वी पाकिस्तानची कोणतीही सलामी जोडी अशी कामगिरी करु शकली नव्हती. यापुर्वी आमिर सोहेल आणि सईद अन्वर यांनी 1998 साली दक्षिण आफ्रिकेत सलामी करताना 101 धावांची भागीदारी केली होती. आता हा विक्रम खूप मागे राहिला आहे.
Shan Masood and Babar Azam piled up the runs after the Proteas enforced the follow-on 👌#WTC25 | #SAvPAK 📝: https://t.co/AUvsQcdxg8 pic.twitter.com/52Acp0QzrX
— ICC (@ICC) January 5, 2025
दक्षिण आफ्रिकेत पाकिस्तानसाठी सर्वात मोठी सलामीची भागीदारी :
- बाबर आझम, शान मसूद - 205 धावा
- आमिर सोहेल, सईद अन्वर - 101 धावा
- सलीम इलाही, तौफिक उमर - 77 धावा
- इमाम उल हक, शान मसूद - 67 धावा
A 🔝 knock sees the Pakistan skipper reach his sixth Test 💯 🤩#WTC25 | #SAvPAK 📝: https://t.co/AUvsQcdxg8 pic.twitter.com/05E7cT3st3
— ICC (@ICC) January 5, 2025
फॉलोऑन खेळताना सर्वात मोठी भागीदारी : तसंच फॉलोऑन खेळताना पाकिस्तानसाठी 205 धावांची ही सर्वात मोठी भागीदारी आहे. यापूर्वी फॉलोऑन खेळताना पाकिस्तानसाठी कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी हनिफ मोहम्मद आणि सईद अन्वर यांच्या नावावर होती. या दोन्ही खेळाडूंनी 1958 साली वेस्ट इंडिजविरुद्ध फॉलोऑन खेळताना 154 धावांची भागीदारी केली होती. आता हा विक्रम शान मसदू आणि बाबर आझमच्या जोडीनं मागं टाकला आहे. शान सध्या 102 धावा करुन क्रीजवर उपस्थित आहे. तर बाबरनं 81 धावा केल्या होत्या.
⚪️🟢 We conclude Day 3 with Pakistan on 213-1 after 49 overs and we hold a lead of 208 runs at the close of play.
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 5, 2025
Marco Jansen got the breakthrough removing Babar Azam for 81. A good start to Day 4 will be key tomorrow at 10:30.#WozaNawe #BePartOfIt #SAvPAK pic.twitter.com/FnAjQoYPpz
फॉलोऑन (कोणत्याही विकेट) दरम्यान पाकिस्तानसाठी सर्वोच्च भागीदारी :
- शान मसूद आणि बाबर आझम विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 205 धावा, 2025
- हनीफ मोहम्मद आणि सईद अहमद विरुद्ध वेस्ट इंडिज : 154 धावा, 1958
- हनीफ मोहम्मद आणि इम्तियाज अहमद विरुद्ध वेस्ट इंडिज : 152 धावा, 1958
- सईद अन्वर आणि सलीम मलिक विरुद्ध ऑस्ट्रेलिया : 148 धावा, 1994
Babar Azam scored 58(127) in first innings & 81(127) in second innings vs South Africa in 2nd Test:
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 5, 2025
- He batted two innings on same day.
- He scored two fifties on same day.
- He dismissed twice on same day.
- THIS IS JUST CRAZY..!!!! 🤯 pic.twitter.com/RyC4sjza75
फॉलोऑन खेळताना कसोटीत सर्वात मोठी सलामीची भागीदारी :
- 205 धावा, शान मसूद आणि बाबर आझम (पाकिस्तान) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केपटाऊन, 2025
- 204 धावा, ग्रॅमी स्मिथ आणि नेईल मॅकन्झी (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स, 2008
- 185 धावा, तमीम ईक्बाल आणि इमरुल कायेस (बांगलादेश) विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स, 2010
- 182 धावा, मार्कस ट्रेस्कोथीक आणि मायकेल वॉन (इंग्लंड) विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंट जॉन्स, 2004
- 176 धावा, ग्राहम गूच आणि मायकेल आथर्टन (इंग्लंड) विरुद्ध भारत, द ओव्हल, 1990
हेही वाचा :