ETV Bharat / entertainment

छोट्याशा गावातून आलेल्या दिलजीत दोसांझनं जिंकलं जग, वाढदिवसानिमित्त जाणून घ्या विशेष गोष्टी... - DILJIT DOSANJH BIRTHDAY

दिलजीत दोसांझ आज आपला 41वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला काही विशेष गोष्टी सांगणार आहोत.

Diljit Dosanjh
दिलजीत दोसांझ (दिलजीत दोसांझ (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 6, 2025, 10:23 AM IST

मुंबई - पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझनं आपल्या आवाजनं अनेकांच्या मनावर जादू केली आहे. आज त्यानं आपल्या गायकीनं जगभरात नाव कमावलं आहे. दिलजीतचा कॉन्सर्ट देशभरात असो या कुठल्याही परदेशात, त्याचा क्रेझ चाहत्यांमध्ये खूप आहे. दिलजीतच्या शोच्या तिकिट खूप कमी वेळात विकल्या जाते. अनेकांना तर त्याच्या कॉन्सर्टच्या तिकिट देखील मिळत नाही. एका छोट्या गावातून येऊन देश-विदेशात नाव कमावणारा दिलजीत आज संपूर्ण पंजाबची ओळख बनला आहे. त्याचे गाणी इतकी जास्त लोकप्रिय आहे, की कोणीही सहज आपल्या प्ले लिस्टमध्ये त्याचे गाणी ठेवतो. आज दिलजीत 6 जानेवारी रोजी आपला 41वा वाढदिवस साजरा करत आहे.

दिलजीत दोसांझबद्दल वैयक्तिक माहिती : दिलजीत दोसांझनंचा जन्म 6 जानेवारी 1984 रोजी पंजाबमधील दुसांझ कलान या छोट्याशा गावात झाला होता. दिलजीतनं लहानपणापासूनच गायन सुरू केले होते. गुरुद्वारांमध्ये तो गायन करत होता. त्यानंतर त्यानं त्याचा पहिला अल्बम 'इश्क दा उडा अदा'मधून संगीत क्षेत्रात प्रवेश केला. पंजाबी इंडस्ट्रीबरोबर त्यानं बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला. त्यानं गायनबरोब अनेक हिट चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. याशिवाय तो हिट गाणी देऊन आता तरुणांच्या मनावर राज्य करत आहे.

दिलजीतची एकूण संपत्ती : मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलजीतची एकूण संपत्ती 170 ते 180 कोटी रुपये आहे. तो एका चित्रपटासाठी 4-5 कोटी रुपये घेतो. याशिवाय तो लाइव्ह कॉन्सर्टसाठी 4-5 कोटी रुपये घेत असतो. त्याचबरोबर दिलजीतच्या कॉन्सर्टचे तिकीट 25 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. दिलजीतचा चाहता वर्ग भारताबाहेरही आहे. दिलजीतचे अनेक लोकप्रिय गाणी आहेत, यात 'प्रॉपर पटोला ', 'डू यू नो' , 'लॅम्बोर्गिनी', 'सौदा खरा खरा' आणि असे अनेक गाणी आहेत. दिलजीत दोसांझ हा काही दिवसांपासून त्याच्या 'दिल ल्युमिनाटी टूर 'मुळे चर्चेत होता. त्यानं भारतामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये कॉन्सर्ट केला आहे. दिलजीतनं भारताबाहेर अबू धाबी, उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्सर्ट केले आहेत.

हेही वाचा :

  1. दिलजीत दोसांझनं नवीन वर्षांची सुरुवात अनोख्या पद्धतीनं केली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
  2. 2025मध्ये एड शीरन ते दिलजीत दोसांझपर्यंत कलाकार करणार कॉन्सर्टद्वारे धमाल, करा तिकिट बुक
  3. 'हजारो उत्तरांपेक्षा माझे मौन बरे...', दिलजीत दोसांझनं कॉन्सर्टमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.