Maharashtra Politics : नेहरु सिगारेट घेण्यासाठी विमान पाठवायचे हे चालतं का? मुनगंटीवारांचा विरोधकांना सवाल
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 16, 2023, 7:10 AM IST
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : Maharashtra Politics : मंत्रिमंडळ बैठकीवर होणारा खर्च आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये मंत्र्यांचे वास्तव्य यावरून विरोधक टीका करत आहेत. त्यातच आता भाजपा नेते आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिउत्तर दिलंय. 'इंडिया'च्या बैठकीत 'इंडिया'तील घटक पक्ष काँग्रेसचे नेते सह्याद्रीवर राहिले होते का? असा सवाल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. तर सरकारी विमानाने बैठकीत ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल कसे आले आणि कुठे राहिले? एवढेच काय तर त्याकाळी सिगारेटसाठी पंडित नेहरु (Pandit Nehru Cigarettes) विमान पाठवायचे, असं प्रतिउत्तर मुनगंटीवार यांनी दिलंय.
संजय राऊतांना टोला : संजय राऊत (Sanjay Raut) पत्रकार परिषदेत येऊन प्रश्न विचारणार असतील तर हरकत नाही. त्यांनी आपल्या पत्रकारिता पेश्याशी प्रामाणिक राहावं. पत्रकार परिषदेमध्ये येत असताना सर्वच ठिकाणी त्यांनी जावं. मोजक्या ठिकाणी हेतू ठेवून येणं योग्य नाही. केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा दौरा शिवसेनेमुळं रद्द झाला असं राऊत म्हणाले, त्यावर उत्तर देताना मुनगंटीवार यांनी हे हास्यास्पद असल्याचं सांगितलं.