नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर' पर्यटकांनी बहरलं, पाहा व्हिडिओ - Mahabaleshwar

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 31, 2023, 10:50 PM IST

सातारा Happy New Year 2024 : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना साताऱ्यातील थंड हवेचं ठिकाण आणि महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर' म्हणून ओळख असलेलं महाबळेश्वर सध्या पर्यटकांनी बहरलं आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं महाबळेश्वर आणि पाचगणीत दाखल झाले आहेत. पर्यटकांच्या स्वागतासाठी बाजारपेठांमध्ये सजल्या आहेत. बाजारपेठेत विद्युत रोषणाईचा झगमगाट पहायला मिळत आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी (Mahabaleshwar Panchgani) दाखल झालेले पर्यटक पॅराग्लायडिंग, हॉर्स रायडिंग, घोडागाडी तसेच नौकाविहाराचा आनंद लुटत आहेत. खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत पर्यटक धमाल मस्ती करत आहेत. महाबळेश्वर आणि पाचगणीतील वेगवेगळ्या पॉईंट्स, टेबल लँडवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पर्यटकांमुळे पसरणी घाट ते महाबळेश्वर मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.