देहरादून : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवल्यानं नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. उत्तराखंडमधील सीमावर्ती जिल्ह्यात शनिवारी पहाटे भूकंपाचा धक्का बसल्यानं मोठा हादरा बसला. पहाटे 4 वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याचं नागरिकांनी स्पष्ट केलं. भूकंपाचे धक्के जाणवल्यानं कडाक्याच्या थंडीत नागरिक घराबाहेर पडून सुरक्षित स्थळी गेले. मात्र आतापर्यंत भूकंपामुळे कुठलंही नुकसान झाल्याचं वृत्त नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पिथौरागढमध्ये भूकंपाचे धक्के :उत्तराखंडमधील सीमावर्ती परिसरात असलेल्या पिथौरागढमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवल्यानं त्यांनी कडाक्याच्या थंडीत घराबाहेर धून ठोकली. या भूकंपाचं केंद्र नेपाळ असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितलं. या भूकंपाची तीव्रता 4.8 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपानं कुठंही नुकसान झालेलं नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. चंपावतसह इतर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली. आतापर्यंत या भूकंपामुळे कुठलंही नुकसान झाल्याचं वृत्त नाही. नेपाळमधील जुमला जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या 10 किमी खोलीवर होता. मात्र, भूकंपाचे धक्के जाणवत असताना बहुतांश नागरिक झोपले होते.
भूकंपाच्या दृष्टीनं संवेदनशील परिसर : उत्तराखंड राज्य भूकंपाच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील राज्य मानलं जाते. त्यामुळे इथं भूकंपाचा धोका कायम आहे. राज्यातील रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागढ, चमोली, उत्तरकाशी हे जिल्हे भूकंप प्रवण क्षेत्रात येतात. रुद्रपूर, हरिद्वार, पौरी, नैनिताल, चंपावत आणि अल्मोडा देहरादून आणि तेहरी जिल्हे भूकंप प्रवण क्षेत्रात येतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र भूकांपाचे धक्के जाणवल्यानं सध्या नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे.
हेही वाचा :
- चांदोली धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का, कुठे आहे भूकंपाचं मुख्य केंद्र? - Earthquake In Sangli
- अमरावती जिल्ह्याला भूकंपाचे धक्के; 4.2 रिश्टर स्केल इतकी तीव्रता, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण - Earthquake in Amravati
- मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील भूकंपाचे हादरे बसल्यानं नागरिकांची पळापळ, 'या' जिल्ह्यात आहे मुख्य केंद्र - EARTHQUAKE IN HINGOLI