Prasad Lad On Love Jihad Law: लव जिहाद कायदा लवकर आणला पाहिजे - प्रसाद लाड - भाजप आमदार प्रसाद लाड
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई: या अधिवेशनात लव जिहाद हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. लव जिहाद बाबत कायदा करण्याबाबत राज्य शासन गंभीर असून हा कायदा लवकर केला जावा, अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. याबाबत बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, गरीब कुटुंबातील महिलांना लालच दाखवून चुकीच्या पद्धतीने फसवणूक केली जाते आणि त्यांचे धर्मांतर करतात. त्यासाठी लव जिहादवर बंदी आणण्याचा कायदा आणला पाहिजे. केरळ सरकारने लव जिहादला पुढे आणले आहे. लग्नाच्या अगोदर पंधरा दिवस त्यांचे धर्मांतर केले जाते. उबेर टॅक्सी ड्रायव्हर, झोमॅटो जमातीच्या लोकांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. हे लोकं घरापर्यंत पोहोचून महिलांचे नंबर घेऊन त्यांना फसवतात. ह्या ॲप कंपन्यांवर लगाम लावला पाहिजे. साताऱ्याच्या महिलांना विवाह करून परत कसे आणले जावे हेसुद्धा तपासले पाहिजे असे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले आहे.