Kas Lake Overflowed: सातारा जिल्ह्यावर पावसाची कृपादृष्टी; कास तलाव भरल्याने प्रशासन व नागरिकांची चिंता मिटली - सातारा जिल्ह्यतील कास तलाव
🎬 Watch Now: Feature Video

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरच्या वेण्णा तलावानंतर सातारकरांची तहान भागवणारा कास तलावही भरला आहे. यामुळे सातारकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. सांडव्यावरून वाहणार्या पाण्यामुळे कास तलावाला भुशी डॅमचा फील आला आहे. यामुळे तलावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. कास तलाव परिसरातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी सातारा नगरपालिकेने कासच्या सांडव्याचे टप्पे केले आहेत. त्यामुळे सांडव्यावरून वाहणार्या पाण्याला भुशी डॅमसारखा फील आला आहे. हे दृष्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावले कासकडे वळत आहेत. मात्र, अतिवृष्टीचा इशारा आणि घाटात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने पर्यटकांना पर्यटनस्थळी मनाई करण्यात आली आहे. हा धोका कमी झाल्यानंतर कास तलाव परिसर पर्यटकांसाठी खुला होईल आणि पर्यटकांना कासच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटता येईल.