Drunk Man Bitten By Snake : दारुड्याने साप पकडला; म्हणाला, 'माझ्या हातावर गरुड रेषा..', पुढे झाले असे काही.. - कर्नाटकात नशेतील माणसाला साप चावला

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 1, 2023, 7:13 PM IST

गडग, कर्नाटक - जिल्ह्यातील नारागुंडा तालुक्यातील हिरेकोप्पा गावात दारूच्या नशेत साप पकडण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला सापाने चावा घेतल्याची घटना शुक्रवारी घडली. गावातील रहिवासी सिद्धप्पा बालागनूर असे साप चावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. झाले असे की, गावातील एका घरात साप आला. ही बाब सिद्धप्पाला कळताच त्याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याने कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय उघड्या हातांनी सापाला पकडले. तेव्हा त्याला साप चावला नाही. माझ्या हातावर गरुड रेषा आहे, असे म्हणत त्याने पकडलेला साप सोडून दिला. नंतर त्याने सापाला पुन्हा पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र सापाने त्याचा चारपेक्षा जास्त वेळा चावा घेतला. त्यानंतर तो खाली कोसळला. त्यानंतर गावात बातमी पसरली की, सापाच्या विषामुळे सिद्धप्पाचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या अंत्यसंस्काराचीही तयारी करण्यात आली. मात्र अंत्यसंस्काराची तयारी करत असताना अचानक सिद्धप्पाला जाग आली. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. सिद्धप्पावर सध्या हुबळी येथील किम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.