हरारे Squad for Test Match : प्रत्येक संघ कसोटी क्रिकेटला गांभीर्यानं घेतो कारण हा खेळाचा सर्वात जुना आणि प्रतिष्ठित फॉरमॅट आहे. यामुळंच जेव्हा जेव्हा एखादा संघ कसोटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर करतो तेव्हा तो बलवान आणि अनुभवी खेळाडूंची निवड करण्याचा प्रयत्न करतो. तथापि, असा एक संघ आहे ज्यानं नवीन चेहऱ्यांवर विश्वास व्यक्त केला आहे आणि त्याने केवळ 1-2 नव्हे तर अर्धाडझन अनकॅप्ड खेळाडूंना आपल्या कसोटी संघात समाविष्ट केलं आहे.
झिम्बाब्वेनं जाहीर केला संघ : हा संघ झिम्बाब्वे आहे. ज्यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. झिम्बाब्वेच्या कसोटी संघात तब्बल सात अनकॅप्ड खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यात फलंदाज बेन कुरन, जोनाथन कॅम्पबेल, यष्टिरक्षक फलंदाज तदिवानाशे मारुमणी, न्याशा मायावो, वेगवान गोलंदाज ट्रेवर ग्वांडू, ताकुडज्वा चटाइरा आणि न्यूमन न्यामाहुरी यांचा समावेश आहे.
Zimbabwe name squad for historic Test series against Afghanistan
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 19, 2024
Details 🔽https://t.co/Ulx0AZPVTg pic.twitter.com/teBTwT5n7v
28 वर्षांनंतर होणार बॉक्सिंग डे कसोटी : झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. झिम्बाब्वे क्रिकेटसाठी हा एक महत्त्वाचा प्रसंग असेल कारण यजमान 28 वर्षानंतर त्यांच्या घरच्या मैदानावर पहिली बॉक्सिंग डे कसोटी खेळणार आहेत. 1996 मध्ये हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झिम्बाब्वेनं इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात बॉक्सिंग डे कसोटी खेळली होती, जी अनिर्णित राहिली होती. तेव्हापासून झिम्बाब्वेनं परदेशात 2000 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आणि 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ बॉक्सिंग डे कसोटी खेळली आहे.
मालिकेचं वेळापत्रक कसं : अफगाणिस्तान विरुद्ध 26 ते 30 डिसेंबर दरम्यान पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर झिम्बाब्वे 2 ते 6 जानेवारी दरम्यान नवीन वर्षातील पहिला कसोटी सामना खेळणार आहे. या वर्षी जुलैमध्ये बेलफास्टमध्ये आयर्लंडविरुद्ध एकतर्फी कसोटी सामना खेळल्यानंतर 2024 मधील झिम्बाब्वेची ही दुसरी कसोटी असेल. यानंतर झिम्बाब्वे मे 2025 मध्ये नॉटिंगहॅम इथं इंग्लंडविरुद्ध 4 दिवसीय कसोटी सामना खेळणार आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध झिम्बाब्वेचा कसोटी संघ पुढीलप्रमाणे : क्रेग एर्विन (कर्णधार), बेन कुरन, ब्रायन बेनेट, जोनाथन कॅम्पबेल, ताकुडझ्वा चटाइरा, जॉयलॉर्ड गुम्बी, ट्रेव्हर ग्वांडू, ताकुडझ्वानाशे कैटानो, तदिवानाशे मारुमनी, ब्रैंडन मावुता, न्याशा मायावो, ब्लेसिंग मुजारबानी, डायोन मायर्स, रिचर्ड नगारवा, न्यूमैन न्यामुरी, सिकंदर रजा, सीन विलियम्स.
हेही वाचा :