Best Diet Guillain Barre Syndrome: राज्यामध्ये गुइनेल बॅरे सिंड्रोमच्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चाचली आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुणे शहरामध्ये एकाच दिवशी जीबीएसचे 28 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे या सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या आता 101 पोहोचली आहे. हा एक दुर्मिळ आजार आहे. हा आजार झाल्यास रोगप्रतिकार शक्ती कमी होते. शिवाय स्थायू देखील कमकुवत होतात.
डॉ. स्मिता सांगडे याच्या मते, गुइनेल बॅरे सिंड्रोम हा मज्जातंतूचा आजार आहे. या आजाराची लागण झाल्यास सुरुवातीला पोटाचे आजार होतात. उदाहरणार्थ उलटी, जुलाब, तसंच पोटदुखी. तसंच हा आजारा झाल्यानंतर पाच ते सात दिवसानंतर रूग्णांच्या हात-पायाची ताकद कमी होते.
- गुइलेन बॅरे सिंड्रोमसाठी सर्वोत्तम आहार
- भाज्या: शरीराचे मज्जातंतूच्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी ब्रेसेल स्पाउट्स, ब्रोकोली, कोबी तसंच इतर सल्फरयुक्त भाज्यांचा समावेश आहारात करावा.
- पाया सूप: पाया सूप मज्जातंतूतील वेदना आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. तसंच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील पाया सूप फायदेशीर आहे. यामध्ये पोटॅशियम, लोह, फायबर, कॅल्शियम तसंच व्हिटॅमिन अ आणि क पोषक तत्व आढळतात. यामुळे हाडं निरोगी राहतात.
- ग्रीन टी: ग्रीन टीमध्ये एपिगॅलोकाटेचिन 3 गॅलेट नावाचं कॅटेचिन असते. जे रोगप्रतिकार शक्ती वाढवते. तसंच पेशी आणि शरीराला होणारे नुकसान टाळण्यास मदत करणारे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट आहेत.
का खाणं टाळावं?
- ओट्स, तांदूळ, राई आणि गहू यासारखी धान्य टाळावी.
- ट्रान्स फॅट्स जास्त असलेले अन्न खावू नये.
- दुग्धजन्य पदार्थ जसे की, चीज, लोणी आणि मलाई खाणं टाळावं.
- केक फ्रॉस्टिंग, चॉकलेट आणि कार्न सिरप यासारखे जास्त साखर असलेले पदार्थ टाळावे.
- उच्च सोडियमयुक्त पदार्थांचं सेवन करू नये.
(अस्वीकरण: ही सामान्य माहिती फक्त वाचण्यासाठी आहे. ईटीव्ही इंडिया माहितीच्या वैज्ञानिक वैधतेवर कोणतेही समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
संदर्भ
https://www.ninds.nih.gov/health-information/disorders/guillain-barre-syndrome
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC3152164/
हेही वाचा