ठाणे : ठाणे रेल्वे रुळावर उभे राहून सेल्फी घेण्याच्या नादात धावत्या एक्सप्रेसची धडक लागून एका २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथ - बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या रेल्वे रुळावर घडली. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली आहे. साहिर अली तैयबा अली (वय २४, रा. काशीपूर ,पश्चिम बंगाल) असं धावत्या एक्सप्रेसची धडक लागून मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे.
कोयना एक्सप्रेसची धडक : लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत साहिर अली हा मूळचा पश्चिम बंगाल राज्यातील काशीपूर गावाचा रहिवाशी होता. तो अंबरनाथ शहरातील फॉरेस्ट नाका भागात राहणाऱ्या नातेवाईकाकडं पाहूणा म्हणून आला होता. त्यातच ४ फ्रेबुवारी रोजी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मृत साहिर अली हा नातेवाईक आणि मित्रांसोबत अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली ग्रुप फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी रेल्वे रुळावर जागा शोध होता. त्याच सुमारास सेल्फी घेताना पुणे येथून येणाऱ्या भरधाव कोयना एक्सप्रेसनं जोरदार धडक दिली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.
लोहमार्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद : दरम्यान, घटनेची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. तर साहिर अलीचा मृतदेह शविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. या घटनेची नोंद कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर या घटनेचा अधिकचा तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करत आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली आहे.
हेही वाचा -