संघाच्या बौद्धिकाला राष्ट्रवादीचे आमदार हजर; म्हणाले, "अजित पवार देखील..." - RSS BAUDHIK NAGPUR
🎬 Watch Now: Feature Video
Published : 2 hours ago
नागपूर : भाजपासह मित्रपक्षाचे आमदारांनी आज (19 डिसेंबर) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट दिली. हिवाळी अधिवेशनाच्या काळात दरवर्षी भाजपाचे आमदार अधिवेशन सुरू असताना एक दिवस सकाळी संघाच्या हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट देतात. यावेळी संघाचे पदाधिकारी आमदारांना संघाच्या कार्याची माहिती देऊन बौद्धिक मार्गदर्शनही करतात. तर आज या स्मृती स्थळाचं दर्शन घेण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेचे नेते दाखल झाले आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार इथं येणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. पण असं असतानाच आता राष्ट्रवादीचे तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी संघाच्या बौद्धिकाला हजेरी लावली आहे. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राजू कारेमोरे म्हणाले की, "यासंदर्भात माझं अजित पवार यांच्याशी काहीच बोलणं झालेलं नाही. मी स्वत: आलोय." तसंच अजित पवार देखील इथं येऊ शकतात, असंही ते म्हणाले.