ETV Bharat / sports

पहिल्याच चेंडूवर षटकार, सर्वात वेगवान अर्धशतक; भारतीय युवा फलंदाजानं केला विश्वविक्रम - RICHA GHOSH FIFTY

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या T20 मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात युवा यष्टिरक्षक-फलंदाज ऋचा घोषनं स्फोटक खेळी केली.

Fastest Half Crntury in T20I
ऋचा घोष (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Dec 20, 2024, 3:06 PM IST

नवी मुंबई Fastest Half Crntury in T20I : भारतीय महिला क्रिकेट संघाची युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋचा घोष तिच्या वेगवान फलंदाजीसाठी आणि मोठे फटके मारण्यासाठी ओळखली जाते. याआधीही आपल्या करिअरमध्ये अनेक स्फोटक खेळी खेळणाऱ्या ऋचा घोषनं आता इतिहास रचला आहे. महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारी ऋचा ही भारतीय फलंदाज ठरली आहे. इतकंच नाही तर षटकार मारताना ऋचानं सर्वात वेगवान अर्धशतकांच्या विश्वविक्रमाची बरोबरीही केली. ऋचाच्या शानदार खेळीशिवाय, स्मृती मंधानाच्या विश्वविक्रमी अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात 217 धावा केल्या, ही भारताची सर्वोच्च धावसंख्याही आहे.

पहिल्या चेंडूवर षटकार, नंतर विक्रमी अर्धशतक : ऋचा घोषचं हे वादळ गुरुवारी 19 डिसेंबरच्या संध्याकाळी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूपासूनच ऋचानं अक्षरशः अंदाधुंद फलंदाजीला सुरुवात केली. 15व्या षटकात स्मृती मंधाना बाद झाल्यानंतर ऋचा क्रीजवर आली. त्याच षटकातील पहिला चेंडू खेळताना ऋचानं सरळ मोठा शॉट खेळला आणि लाँग ऑफ बाऊंड्रीवर शानदार षटकार ठोकला. 20 व्या षटकात ती बाद होईपर्यंत तिची ही शैली कायम राहिली.

सर्वात जलद अर्धशतकाची बरोबरी : 21 वर्षीय उजव्या हाताची फलंदाज ऋचानं त्यानंतर वेस्ट इंडिजच्या प्रत्येक गोलंदाजाच्या गोलंदाजीवर आक्रमक फटके मारण्यावर लक्ष केंद्रित केलं. काही वेळातच ऋचानं 3 चौकार आणि 5 षटकार मारले. तिच्या 5व्या षटकारासह, ऋचानं आंतरराष्ट्रीय T20 मध्ये तिचं दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. तिचं हे अर्धशतक अवघ्या 18 चेंडूत आलं, जे भारतासाठी केवळ सर्वात वेगवान अर्धशतकच नाही तर महिलांच्या T20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वात जलद अर्धशतकाच्या विक्रमाची बरोबरी आहे. ऋचाआधी न्यूझीलंडची अनुभवी सोफी डेव्हाईन आणि ऑस्ट्रेलियाची युवा फलंदाज फोबी लिचफिल्ड यांनीही प्रत्येकी 18 चेंडूत अर्धशतकं झळकावली आहेत.

महिला T20I मधील सर्वात वेगवान अर्धशतकं :

  • 18 चेंडू : ऋचा घोष विरुद्ध वेस्ट इंडीज, 2024
  • 18 चेंडू : फोबी लिचफिल्ड विरुद्ध वेस्ट इंडिज, 2023
  • 18 चेंडू : सोफी डिव्हाईन विरुद्ध भारत, 2015

भारतानं उभारली सर्वात मोठी धावसंख्या : 21 वर्षीय ऋचानं 21 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीनं 54 धावांची स्फोटक खेळी केली, ज्यामुळं भारतीय संघानं आपली धावसंख्या 200 च्या पुढं नेण्यात यशस्वी ठरला. अशा प्रकारे भारतीय संघानं T20I मध्ये 217/4 ही सर्वोच्च धावसंख्या बनवली. यापूर्वी, भारतीय क्रिकेट संघाचा T20 फॉरमॅटमधील सर्वोच्च स्कोअर 201/5 धावा होता जो या वर्षी जुलैमध्ये बनला होता. भारताला या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात ऋचा घोष व्यतिरिक्त स्मृती मंधानाचंही महत्त्वाचं योगदान होतं, जिनं मालिकेतील सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावून मोठा पराक्रम केला. यादरम्यान तिनं T20I क्रिकेटमध्ये 500 चौकार पूर्ण करण्याचा विक्रमही केला.

हेही वाचा :

  1. ...तर मला 'हर्ट अटॅक' आला असता; निवृत्तीनंतर अश्विन असं का म्हणाला?
  2. 4,4,4,4,6,4,4... स्मृतीनं लगावल्या सात चेंडूत 7 'बाउंड्री'; केला नवा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
  3. नव्या कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली पाहुण्यांची मालिका विजयाची 'हॅट्ट्रिक'; आफ्रिकन संघ 'होम ग्राउंड'वर अपयशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.