Independence Day 2023 : मंत्रालय, सीएसटी रंगले तिरंगी रंगात, Watch Video - मंत्रालय
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई : देशात दरवर्षी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राजधानी दिल्लीतील लाल किल्यावरून दरवर्षी देशाचे पंतप्रधान तिरंगा ध्वज फडकवतात. यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्यावर ध्वजारोहण करतील. राज्यातही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस व राज्याचे मंत्रालय तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाले आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी या दोन्ही इमारती तिरंग्यान्या रंगाने उजळून निघाल्या आहेत. त्यावेळचे हे दृष्य अत्यंत मोहक दिसत होते. या सोबतच देशातील इतर महत्वाच्या इमारती देखील तिरंगी रंगाने उजळल्या आहेत. पाहा हा व्हिडिओ..