ICC World Cup 2023 : पुण्यातील गहुंजे येथील स्टेडियमवर 'अशी' करण्यात आली तयारी; पाहा व्हिडिओ - आयसीसी वल्ड कप 2023

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2023, 10:19 PM IST

पुणे : ICC World Cup 2023 : आज 5 ऑक्टोबर पासून भारतात क्रिकेट विश्वकपला सुरुवात झाली आहे. यात विशेष बाब म्हणजे, तब्बल 27 वर्षानंतर पुण्यात आयसीसी पुरुष करंडक क्रिकेट स्पर्धेचे सामने होणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार आणि (Gahunje International Stadium) अपेक्स बॉडीच्या प्रयत्नाने या वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील पाच सामन्यांचे यजमानपद महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमला (host of ICC Men Cup cricket tournament) मिळाले आहे. यात मुख्य आकर्षण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा (World Cup cricket matches) १९ ऑक्टोबरचा बांगलादेश विरुद्धचा सामना हा असणार आहे. एकूणच गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमला जे सामने होणार आहे त्याबाबतच्या तयारीबाबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अपेक्स बॉडीचे सदस्य सुहास पटवर्धन यांच्याशी खास बातचीत केली आहे. 

यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अपक्स बॉर्डीचे सदस्य सुहास पटवर्धन म्हणाले की ही, आमच्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे की यंदाच्या या वर्ल्डकप सामन्यांचे 5 सामने हे गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे या वर्ल्ड कप नंतर स्टेडियमवर पाणी जिरवण्याची देखील खास सोय आम्ही करणार आहोत. पाणी अडवा, पाणी जिरवा याची खास सोय येणाऱ्या काळात करण्यात येणार आहे. तसेच जे प्रेक्षक स्टेडियम मध्ये सामने बघायला येणार आहे.त्यांना मोफत पाणी देण्यात येणार आहे.तर स्टेडियम च्या दोन्ही बाजूला पवेलियन करण्यात येत आहे. जेणे करून उन्हाचा त्रास प्रेक्षकांना होणार नाहीये.

तसेच ते पुढे म्हणाले की, गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर जे 5 सामने होणार आहे. त्या सामन्यांसाठी 8 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे जे प्रेक्षक तिकीट काढणार आहे त्यांना ऑनलाईन मेल तसेच व्हॉट्सअपद्वारे कोणकोणत्या मार्गाने कसं यायचं आहे ते दाखवल जाणार आहे. तसेच पुणे महापालिका, पिंपरी महापालिका आणि पीएमआरडीए यांच्याशी बोलून बसेसची देखील प्रेक्षकांच्या साठी सोय करण्यात येणार आहे असं देखील यावेळी सुहास पटवर्धन म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.