ETV Bharat / state

मंत्रिपद, खातेवाटप अन् आता पालकमंत्री पदावरून रस्सीखेच - MAHARASHTRA GUARDIAN MINISTER

शिवसेनेकडे असलेले उत्पादन शुल्क खातेही अजित पवारांनी स्वतःकडे घेतलंय. परंतु खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदावरून महायुतीत मोठ्या प्रमाणात रस्सीखेच बघायला मिळत आहे.

Tug of war over the post of Guardian Minister in the Grand Alliance
महायुतीत पालकमंत्री पदावरून रस्सीखेच (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

मुंबई - अखेरकार शनिवारी 21 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर झालंय. काही महत्त्वाची खाती भाजपाकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तर काही खाती शिवसेनेकडून भाजपाला देण्यात आलीत. विशेष म्हणजे अजित पवार अर्थ खाते आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झालेत, तर शिवसेनेकडे असलेले उत्पादन शुल्क खातेही अजित पवारांनी स्वतःकडे घेतलंय. परंतु खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदावरून महायुतीत मोठ्या प्रमाणात रस्सीखेच बघायला मिळत आहे.

मुंडे भावा-बहिणीत बीडच्या पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनसुद्धा मुख्यमंत्रिपदापासून खाते वाटपापर्यंत जवळपास महिन्याभराचा कालावधी गेलाय. त्यानंतर आता पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू झालीय. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही भावा बहिणींनी मंत्रिपदं आपल्याकडे घेतल्यानंतर आता पालकमंत्रिपदासाठी आग्रहाची भूमिका घेतलीय. पंकजा मुंडे यांचा मागच्या विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या आताच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. परंतु भाजपाकडून विधान परिषदेवर त्यांची वर्णी लावण्यात आल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्याकडे पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी देण्यात आलीय. तर शिंदे सरकारमध्ये कृषिमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडणाऱ्या धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आलीय. तरीही बीडच्या पालकमंत्री पदासाठी या दोन्ही नेत्यांकडून परस्पर दावा केला जातोय.

रायगडावर भरत गोगावले यांचा दावा : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून यापूर्वीसुद्धा अनेक वाद निर्माण झालेत. महाविकास आघाडी सरकारच्या दरम्यान रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हे अदिती तटकरे यांच्याकडे होतं. तेव्हा शिवसेना आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी तटकरे विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर उदय सामंत यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं. आता महायुतीत अजित पवार यांचा समावेश असल्याकारणाने रायगडच्या पालकमंत्रिपदावरून पुन्हा रस्सीखेच सुरू झालीय. त्यातच भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा केला असल्याने हा पेच सोडवायला मुख्यमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात अदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बालकल्याण हे खातं कायम ठेवण्यात आलं असून, भरत गोगावले यांना रोजगार हमी, फलोत्पादन, खारपाणपट्टा विकास हे खातं देण्यात आलंय.

संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होणार? : दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर दावा केलाय. या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, मागील 40 वर्षांपासून मी शिवसेनेचं काम करीत आलोय. त्या कामाचं, कष्टाचं फळं मला मिळालंय. मंत्रिपदाची ही संधी मला लोकांची सेवा करण्यासाठी मिळाली असून, सामाजिक न्याय या खात्याचं मंत्रिपद मला मिळालं असल्याकारणाने मी फार आनंदित आहे. यासोबत छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार असून, या संदर्भातील फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याचंही संजय शिरसाट म्हणालेत. तर दुसरीकडे भाजपाचे नेते, ओबीसी कल्याण, दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनीसुद्धा छत्रपती संभाजी नगरच्या पालकमंत्रिपदावर दावा केला असल्याने पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचाः

महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटपाची लॉटरी फुटली, फडणवीस यांच्याकडे गृह, शिंदेना नगरविकास तर पवारांकडे अर्थ खाते - MAHARASHTRA PORTFOLIO ALLOCATION

उपमुख्यमंत्री पदावरून मंत्री मुश्रीफांचा 'यू टर्न'; म्हणाले लोकांना उत्साहित करण्यासाठी बोललो - MINISTER HASAN MUSHRIF

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.