मुंबई : 2024 हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीसाठी खूप जबरदस्त ठरलं आहे. यावर्षी असे अनेक चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाले आहेत, ज्यात कलाकारांनी मेकओव्हर आणि अभिनय करून पात्रांना जिवंत केलंय. चला तर मग भारतीय चित्रपटसृष्टीतील त्या चित्रपट आणि पात्रांवर एक नजर टाकूया.
'पुष्पा 2: द रूल' : अभिनेता अल्लू अर्जुनचा नवीन चित्रपट 'पुष्पा 2' या वर्षातील संस्मरणीय चित्रपटांपैकी एक आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पराज' या भूमिकेनं या चित्रपटातील मोठ्या स्तरावर नेलं आहे. 'पुष्पा 2' चित्रपटातील दृश्यानं सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आता देखील जोरदार कमाई करत आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटानं 1000 कोटीचा आकडा पार केला आहे. याशिवाय जगभरात या चित्रपटानं 1500 कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. या चित्रपटामधील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाचं मेकओव्हर अनेकांना आवडलं.
'स्त्री 2': अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2' या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक ठरला आहे. या चित्रपटांमध्ये सरकटाच्या दहशतनं 'स्त्री 2'ला जीवदान दिलंय. चित्रपटातील सरकटेची भूमिका जम्मू-काश्मीर पोलिस सुनील कुमारनं केली आहे. त्याची उंची 7.7 फूट आहे. दरम्यान या चित्रपटात सरकटाचा चेहरा संपूर्णपणे सीजीआयनं तयार केला गेला होता. 'स्त्री 2'मध्ये सुनील व्यतिरिक्त, श्रद्धा कपूरनं देखील या चित्रपटामध्ये जबरदस्त अभिनय केला आहे.
'कल्की 2898 इ.स.' : साऊथ सिनेमातील ब्लॉकबस्टर सायन्स फिक्शन चित्रपट 'कल्की 2898 एडी'नं यावर्षी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटातील काही कलाकारांचा मेकओव्हर असा होता की, त्यांना ओळखणे देखील कठीण झालं होतं. या चित्रपटात कमल हासन आणि अमिताभ बच्चन यांचा नवा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळाला. 'कल्की 2898 एडी' चित्रपटात अमिताभ बच्चननं महाभारत काळातील अश्वत्थामाची भूमिका साकारली होती, तर कमल हासननं 'सुप्रीम यास्किन'ची भूमिका केली होती. दोन्ही कलाकारांच्या मेकओव्हरनं सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं.
'मुंज्या' : 'मुंज्या'मधील भूमिकेसाठी शर्वरी वाघला दररोज 5 तास मेकओव्हर करावं लागत होतं. परिवर्तनासाठी शर्वरीनं खूप मेहनत घेतली होती. शूटिंग संपल्यानंतर मेकओव्हर काढण्यासाठी आणखी दीड तास तिला लागत होता लागला. शर्वरीनं एका संवादादरम्यान म्हटलं होतं,'सीजीआयद्वारे तिच्यात झालेल्या परिवर्तनामुळे तिला भूमिका साकारण्यात खूप मदत मिळाली.' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट ठरला होता.
'भूल भुलैया 3' : कार्तिक आर्यनचा हॉरर कॉमेडी 'भूल भुलैया 3' प्रेक्षकांसाठी दिवाळीची एक सर्वोत्कृष्ट भेट होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सलग 1 महिना राज्य केलं. 'भूल भुलैया 3' चित्रपटाच्या शेवटी दाखवलेल्या ट्विस्टनं प्रेक्षकांना शिट्ट्या मारायला भाग पाडलं. चित्रपटात कार्तिक आर्यनचा एक सीन दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये तो मंजुलिकाच्या आत्म्याच्या भूमिकेत दिसत आहे. कार्तिकची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली. यासाठी देखील त्यानं मेकओव्हर केलं होतं.
हेही वाचा :
हिंदी आवृत्तीमध्ये 600 कोटी क्लबमध्ये 'पुष्पा 2'नं केला प्रवेश...
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट या दिवशी ओटीटीवर होईल प्रदर्शित?
अल्लू अर्जुनच्या अटकेमुळे 'पुष्पा 2'च्या कमाईवर परिणाम, जाणून घ्या किती कोटीचा गाठला आकडा...