ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2'नं बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली 2'चा मोडला रेकॉर्ड... - PUSHPA 2 BREAKS RECORDS BAAHUBALI 2

अल्लू अर्जुन अभिनीत 'पुष्पा 2'नं 17व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली 2'चा रेकॉर्ड मोडला आहे.

पुष्पा 2
pushpa 2 (पुष्पा 2 कलेक्शन डे 17 (Film Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 22, 2024, 12:41 PM IST

मुंबई - अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'पुष्पा 2' रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक विक्रम मोडत आहे. आज 'पुष्पा 2'नं इतिहास रचला असून 'बाहुबली 2'चा रेकॉर्ड मोडला आहे. 175 कोटींची जबरदस्त ओपनिंग करत 'पुष्पा 2'नं बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली होती. आता रिलीजच्या 17 दिवसांनंतर, या चित्रपटानं 'बाहुबली 2'चा रेकॉर्ड मोडल्यानंतर अल्लू अर्जुनचे चाहते खुश आहेत. 17व्या दिवशी 'पुष्पा 2' चित्रपटानं किती कमाई जाणून घेऊया.

17व्या दिवशी 'पुष्पा 2'ची एकूण कमाई : अभिनेता अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'नं 17व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 25 कोटी रुपयांची कमाई केली आहे, यासह चित्रपटाचं एकूण देशांतर्गत कमाई 1030.23 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान 'बाहुबली 2'नं 1030 रुपयांचे कलेक्शन केलं होतं. 'पुष्पा 2'नं या चित्रपटाचा सहज विक्रम मोडला आहे. कालपर्यंत 'पुष्पा 2'नं 1500 कोटींचा आकडा पार केला होता. हिंदी पट्ट्यात या चित्रपटानं 645 कोटींची कमाई करून विक्रम केला होता. यासह हा हिंदीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तसेच आता हा चित्रपट 'दंगल'चं विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. दरम्यान हा चित्रपट रिलीजच्या 18व्या दिवसात आहे. हा चित्रपट आज 5.41 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 1035.31 होईल.

'बाहुबली 2'मागे : एसएस राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'बाहुबली 2'नं कमाईचे नवे विक्रम रचले होते. हा चित्रपट 2017 मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं जगभरात 1800 कोटीची कमाई केली होती. 'बाहुबली 2'ला जगभरात फक्त आमिर खानच्या 'दंगल'नं मागे टाकले आहे. 'दंगल' या चित्रपटानं 2000 कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. आता अनेकांना 'पुष्पा 2'कडून खूप अपेक्षा आहे.

'पुष्पा 2' वीक वाईज कलेक्शन

दिवस 1- 175 कोटी (ओपनिंग)

पहिला आठवडा – 725.8 कोटी

दुसरा आठवडा- 986 कोटी

तिसरा वीकेंड- 1032 कोटी

'पुष्पा 2' चित्रपटाबद्दल : 'पुष्पा 2' हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, फहद फासिल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 'पुष्पा 2' चित्रपटात डान्सिंग क्वीन श्रीलीलानं देखील डान्स नंबर केला आहे.

हेही वाचा :

  1. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट या दिवशी ओटीटीवर होईल प्रदर्शित?
  2. 'पुष्पराज' ते 'सरकटा'पर्यंत, 2024चे प्रभावी मेकओव्हर
  3. 'पुष्पा 2'ची भारतात 1000 कोटींची कमाई, 'बाहुबली 2'चा विक्रम मोडण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.