ETV Bharat / state

ज्वेलर्स दुकानावरील गोळीबारात सेल्समनचा मृत्यू, चोरट्यांशी एकटीच लढली भाजी विक्रेता महिला - THANE CRIME NEWS

शहापूरमध्ये शनिवारी रात्री साडेदहा वाजता ज्वेलर्स दुकानाच्या बाहेर दुचाकीवरून येऊन गोळीबार करण्यात आला. यात एका सेल्समनचा मृत्यू झाला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Thane crime gun firing
दुकान मालकावर गोळीबार करताना सेल्समनचा मृत्यू (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2024, 12:19 PM IST

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भर रस्त्यात ज्वेलर्स दुकान मालकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात मालकासोबत असलेल्या सेल्समनचा मृत्यू झाला. ही घटना ठाणे जिल्हातील शहापूर शहरालगतच्या गोठेघर हद्दीतील पंडीतनाका येथील महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानाच्या बाहेर घडली आहे. दिनेशकुमार माणाराम चौधरी (वय २५) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या सेल्समनचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनेशकुमार हा महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानात सेल्समनचं काम करत होता. तो नेहमीप्रमाणे दुकान मालकासह शनिवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास दुकानात बंद करून आपापल्या घरी निघाले होते. त्यांच्यासोबत दोन कामगारदेखील दुकानात होते. सर्वजण दुकान बंद करून निघणाच्या तयारीत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी चौधरी यांच्यावर गोळीबार केला. यावेळी भाजीविक्री करणारी महिला मदतीसाठी धावली. तेव्हा दोन्ही हल्लेखोरांनी तिलाही धमकाविले. गोळीबारात चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आलं आहे. मात्र, आज (रविवार ) पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

ज्वेलर्स दुकानावरील गोळीबारात सेल्समनचा मृत्यू, (Source- ETV Bharat Reporter)
  • दरम्यान, गोळीबार करणारे दोघेही हल्लेखोर फरार झाले आहेत. या घटनेमुळे शहापुरात खळबळ उडाली आहे. पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांसह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळी श्वानपथक बोलावण्यात आले आहे. अधिक तपास सुरू आहे.

व्यापारीवर्गात भीतीचे वातावरणवरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "दिनेशकुमार हे सेल्समन म्हणून दुकानात कार्यरत होते. काल रात्रीच्या सुमारास नेहमीप्रमाणं दुकानात बंद करून मालक आणि दिनेश रस्त्यानं जात होते. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी मालक आणि सेल्समनवर गोळीबार केला. त्यांनी सेल्समनजवळ असलेली बॅग पळवली. या बॅगमध्ये महत्वाचं कागदपत्र असल्याचे सांगण्यात आलं. शहरात आणि नाशिक मुंबई महामार्गावरील इतरही सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक केल्यावर गोळीबाराचे कारण समोर येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. दुसरीकडे या गोळीबाराच्या घटनामुळं व्यापारीवर्गात भीतीचं वातावरण पसरले आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी व्यापारी संघटना करीत आहेत.

हेही वाचा-

  1. जळगाव शहरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार; घराजवळ सापडली मोटारसायकल
  2. फिल्मी स्टाईल चोरी; बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी भरदिवसा लुटलं सोनं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.