Which Colour Rice Is Best: भारतातच नव्हे तर जगभरात सर्वात जास्त घेतलं जाणारं पिक म्हणजे तांदूळ. अनेकांचं जेवण भाताशिवाय अपूर्ण आहे. बहुतांश घरामध्ये पांढऱ्या रंगाचा भात खाल्ला जातो. भात पचायला सोपा आणि हलका असतो. परंतु विविध कारणांमुळे अनेक लोक भात खाणं टाळतात. कारण भात खाल्लामुळे वजन वाढतं, तर काही लोक मधुमेहाची समस्या असल्यामुळे भात खाऊ शकत नाही. वेगवेगळ्या रंगाचे तांदूळ बाजारात उपलब्ध आहेत. जसे की, पांढरा, ब्राऊन, ब्लॅक, लाल प्रत्येकाचे आप-आपले फायदे आणि तोटे आहेत. चला तर पाहूया आरोग्याच्या दृष्टीनं तज्ज्ञांच्या मते कोणत्या तांदळाचा भात खाणं चांगलं.
- पांढरा तांदूळ: जगभरामध्ये पांढरा तांदूळांना जास्त प्रमाणात खाल्ला जातो. पांढऱ्या तांदळावर अनेक प्रक्रीया केल्या जातात. परिणामी त्यातील फायबरसह अनेक पोषक तत्व नाहीसे होतात. तसंच तांदळावर प्रक्रिया केल्यामुळे त्यातील ग्लायसेमिक इंडेक्सची समस्या आणि रक्तातील सारखेचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता असते.
- रेड तांदूळ: रेड तांदळामध्ये फायबर तसंच ॲंटिऑक्सिडेंट्स मुबलक प्रमाणात असतात. रेड तांदळाचं भात खाल्ल्यास कोलेस्टेरॉल कमी होतो. जे हृदयाचे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. तसंच यामध्ये फायबर आणि लोह भरपूर असतं. ज्यामुळे जास्त काळ पोट भरलेलं राहतं. यामुळे वजनही कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.
- काळा तांदूळ: ॲंथोसायनिन घटकांमुळे या तांदळाचा रंग काळा होतो. या तांदळामध्ये व्हिटॅमिन ई तसंच लोह पुरेशा प्रमाणात आढळते. यामुळे हृदयाच्या आरोग्यासोबतच यकृत देखील चांगलं राहतं. तसंच या तांदळाच्या नियमित सेवनान तणाव कमी होते. तसंच इम्यूनिटीसीठी हा तांदूळ चांगला आहे. या तांदळामध्ये फायबर आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे जास्त काळ पोट भरलेलं राहतं.
- ब्राऊन तांदूळ: पोषणतज्ज्ञ डॉ. गायत्री देवी यांच्या मते इतर तांदळाच्या तुलणेत ब्राऊन राइस सगळ्यात हेल्दी मानला जातो. यात फायबर मुबलक प्रमाणात असते. तसंच हे कमी प्रोसेड्स असते. यात फॉस्फोरस, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, सेलेनियम यासारखे पोषक घटक आढळतात. जे पचनक्रिया सुधारते आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करते. तसंच ब्राऊन तांदूळ वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. ब्राऊन तांदळामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यातील फायबर आणि मॅग्नेशियम कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवते. परिणामी हृदरोगाचा धोका कमी होतो. त्याचबहरोबर यातील फेनोलिक आणि लिगनान्स तत्व शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढून कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
- पोषणतज्ज्ञांच्या मते, ब्राऊन तांदळाव्यतीरिक्त रेड, ब्लॅक खाणं चांगलं आहे. ब्लॅक तांदळामध्ये ॲंटिऑक्सडेंट्स जास्त प्रमाणात आढळतात. यामुळे अनेक आजारांपासून तुमचं बचाव होवू शकते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/33336992/