सिंधुदुर्ग : गोवा-महाराष्ट्राला जोडणाऱ्या तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या कालव्याला भगदाड पडल्यानं गोव्याला होणारा पाणी पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे कालव्याच्या डागडूजीचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. हा प्रकार दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी भोमवाडी इथं घडला असून या प्रकारानं परिसरात खळबळ माजली आहे.
अलिकडेच घोटगेवाडी केर नदी पात्रातील जलवाहिनी कोसळून पाणी पुरवठा बंद झाल्याची घटना घडली होती. त्यातच कालव्याला भगदाड पडलं आहे. त्यामुळं तिलारी प्रकल्पाच्या कामावरच शंका उपस्थित केली जात आहे. विशेष म्हणजे या कालव्याची सप्टेंबरमध्ये दुरूस्ती करण्यात आली होती. हा कालवा फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडून कुडासे-वानोशी-साटेली-भेडशी रस्ता बंद झाला आहे.
कालवा फुटल्यामुळे पाणी शेती आणि घरात पाणी शिरले आहे. त्यामुळं पावसाळ्यात पूरजन्य परस्थिती निर्माण होते, तसं पाणी वाहत होतं. संतापलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं. कालवा फुटल्यानं गोवा राज्यातील डिचोली तालुक्यात तसंच जल शुध्दीकरण प्रकल्पालावर याचा मोठा परिणाम झाला असून गोव्याचा पाणी पुरवठा खंडित झाला आहे.
- साटेली भेडशी भोमवाडी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून माती भराव टाकून केलेल्या कालव्यात मोठ्या प्रमाणात गळती आहे. शिवाय कालवे बांधून जवळपास चाळीस वर्षे झाली. कालवा लाईफ संपले तरी हे कालवे पक्का स्वरूपात किंवा पुन्हा योग्य प्रकारे दूरुस्तीवर लक्ष दिलं गेलं नाही. देखभाल दुरुस्ती केवळ कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात मात्र कोणतेही काम झालेले नाही. ही स्थिती तिलारी धरणाच्या डाव्या आणि उजव्या तसेच इतर कामात बघायला मिळते.
गोव्याकडून दखल मुख्यमंत्र्यांनी दिली भेट : गोव्यातील पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर सायंकाळी उशिरा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भेट दिली. गोव्या प्रमाणेच महाराष्ट्रात ही कालव्याची दुरुस्ती करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केले.
हेही वाचा :
काँग्रेस उद्धव ठाकरेंना जाणिवपूर्वक बाजूला करतंय का? उदय सामंतांचा सवाल; का म्हणाले असं?
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांचा सुळसुळाट : किरीट सोमय्या