नवी दिल्ली : वक्फ बोर्ड विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या अहवालावर शुक्रवार आणि शनिवारी बैठक होणार होती. परंतु, बैठकीच्या पहिल्याच दिवशी खासदारांमध्ये राडा झाला. यामुळे विरोधी पक्षातील 10 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई केलेल्या खासदारांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत, एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांचा समावेश आहे. बैठकीत गदारोळ झाल्यामुळे ही बैठक 27 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
#WATCH | Delhi: Chairman of JPC on Waqf (Amendment) Bill, 2024, Jagdambika Pal says, " today's meeting has concluded. two important delegations had come today, as witnesses. one delegation, led by mirwaiz umar farooq, was from j&k. the other one was from lawyers for justice, which… pic.twitter.com/dUFCATX8an
— ANI (@ANI) January 24, 2025
चर्चेत नेमकं काय घडल? : भाजपा खासदार जगदंबिका पाल हे वक्फ विधेयकाच्या संसदीय समितीचे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले की, आम्ही आज (दि.24) मीरवाईज उमर फारूक यांच्या शिष्टमंडळाला त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वेळ दिला होता. मात्र, संसदेत विधेयकाच्या चर्चेत सहभागी न होणारे असदुद्दीन ओवेसी आज चर्चेत सहभागी झाले. तसंच तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी माझ्याशी बोलताना असंसदीय भाषा वापरली. मी त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत होतो. पण ते ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी खासदारांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव दिला. निलंबित सदस्यांमध्ये कल्याण बॅनर्जी, मोहम्मद जावेद, ए राजा, असदुद्दीन ओवैसी, नसीर हुसेन, मोहिबुल्ला, मोहम्मद अब्दुल्ला, अरविंद सावंत, नदीम-उल हक, इम्रान मसूद यांचा समावेश आहे.
#WATCH | Delhi | On meeting with JPC on Waqf (Amendment) Bill, 2024, Head of Mutahida Majlis-E-Ulema, Mirwaiz Umar Farooq says, " i was leading a delegation of the ulemas of j&k and we are also in consultation with the ulemas of leh and kargil. they have given us full support to… pic.twitter.com/oUH1adlDAl
— ANI (@ANI) January 24, 2025
सरकारला हवं वक्फच्या मालमत्तेवर नियंत्रण : वक्फ विधेयकाच्या बैठकीची सुरुवातच गदारोळानं झाली. यावेळी बोलताना विरोधकांनी आरोप केला की, विधेयकात जे बदल सुचविले आहेत, त्या नव्या मसुद्याचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला नाही. काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद निलंबन झाल्यानंतर म्हणाले की, सरकारला वक्फच्या मालमत्तांवर नियंत्रण हवे आहे.
#WATCH | On being suspended for a day from the JPC on the Waqf (Amendment) Bill, Shiv Sena (UBT) MP Arvind Sawant says, " the jpc is being run with some dictatorial tendency, what kind of hurry is there i fail to understand that... it's an important bill that can create chaos in… pic.twitter.com/hluTPUM382
— ANI (@ANI) January 24, 2025
वक्फ विधेयकात 44 दुरुस्त्या : विधेयकात एकूण 44 दुरूस्त्या सुचवण्यात आल्या आहेत. यातील प्रत्येक दुरूस्तीवर जेपीसीच्या दोन दिवसांच्या बैठकीमध्ये चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र बैठकीच्या पहिल्याच दिवशी गदारोळ झाल्यानं ही बैठक 27 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
हेही वाचा :