नक्षलवाद्यांचा गड उद्धस्त करण्यात आम्हाला यश - झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन - हेमंत सोरेन
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 23, 2023, 3:44 PM IST
|Updated : Nov 23, 2023, 7:03 PM IST
नागपूर Hemant Soren On Naxalism: झारखंडमधील चाईबासा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या ब्लास्टमध्ये एक जवान शहीद झाला आहे. या संदर्भात बोलताना झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, त्या ठिकाणी नक्षल विरोधी मोहीम सुरू आहे. (Naxalites Blast In Jharkhand) तिथे अशा प्रकारच्या घटना घडत असतात. तीन-चार दिवसांपूर्वी देखील एक अशी घटना घडली होती. (Naxalites exterminated in Jharkhand) आमचे जवान आणि सीआरपीएफ जवान मिळून नक्षलवाद्यांचा पूर्ण सफाया करण्याच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांचा तो गड होता. तो पूर्णपणे उध्वस्त करण्यात आम्हाला यश आलेलं आहे. जवान हुतात्मा होतात त्यामुळे दुःख तर होतं. अशा जवानांवर आम्हाला गर्व असल्याचं ते म्हणाले. तपास यंत्रणा वारंवार नोटीस देऊन देखील तुम्ही योग्य उत्तर देत नाहीत, असा प्रश्न विचारताचं हेमंत सोरेन यांनी काढता पाय घेतला.