Heavy Rain In Mahabaleshwar : महाबळेश्वरमध्ये एका दिवसात 153 मिलिमीटर पाऊस, वेण्णा तलाव ओव्हर फ्लो- पाहा व्हिडिओ - Heavy Rain In Mahabaleshwar
🎬 Watch Now: Feature Video
सातारा : महाबळेश्वरमध्ये एका दिवसात तब्बल 153 मिलीमीटर पाऊस पडला असून महाबळेश्वर-पाचगणीकरांची तहान भागविणारा वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. सध्या वेण्णा तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. गेली पंधरा दिवस महाबळेश्वर, पाचगणी परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. आज अखेर या परिसरात 1 हजार 301 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या दमदार पावसाबरोबरच डोंगररांगांवर दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. यामुळे पर्यटकांना निसर्गाचा अनोखा अविष्कार अनुभवायास मिळत आहे. ओसंडून वाहणार्या वेण्णा लेक परिसरातील दाट धुक्यात पर्यटक सेल्फी घेऊन पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहेत. मुसळधार पावसामुळे मुंबई, पुणे गुजरातमधील पर्यटकांची महाबळेश्वरमध्ये मोठी गर्दी झाली होती. वेण्णालेक डॅमजवळ पर्यटक गरमागरम मक्याचा भुट्टा आणि चायभजीचा आस्वाद घेत होते. शनिवार रविवार असल्याने नेताजी सुभाष चौक, बाळासाहेब ठाकरे चौक परिसरात पर्यटकांच्या वाहनांची मोठी गर्दी होती.