सोनं पुन्हा झळाळलं ; 'सुवर्णनगरी' जळगावात सोन्याच्या दरात मोठी उसळी - दिवाळीनंतर सोन्याच्या दरात वाढ
🎬 Watch Now: Feature Video


Published : Dec 3, 2023, 10:58 AM IST
|Updated : Dec 3, 2023, 2:22 PM IST
जळगाव Gold Rate Hike : दिवाळीला 60 हजार रुपयांपर्यंत असलेल्या सोन्याच्या दरानं मुसंडी मारली असून तब्बल महिनाभरात सोन्याच्या दरात साडेतीन हजार रुपयांनी वाढ झालीय. शनिवारी (2 डिसेंबर) सोन्याचा भाव 63 हजार 500 वर, तर चांदीचा भाव 78 हजारांवर गेल्याचं पाहायला मिळालं. मात्र, सध्या लग्नसराई सुरू असल्यानं सुवर्णनगरीत सोनं खरेदीवर भाव वाढीचा कुठलाही परिणाम झालेला नाही. तसंच सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी कायम असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, जागतिक बँकेच्या व्याजदरात वाढ झाल्यामुळं तर दुसरीकडं सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्यामुळं त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. त्यामुळं जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने उच्चांकी गाठलीय. तसंच महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल साडेतीन हजार रुपयांनी वाढ झाल्याची माहिती सुवर्ण व्यवसायिकांनी दिलीय. दिवाळीनंतर सोन्याचे दर कमी होतील अशी अपेक्षा होती. मात्र, सोन्याच्या दरात तब्बल साडेतीन हजार रुपयांनी वाढ झाल्यामुळं सर्वसामान्यांचं बजेट काहीसं कोलमडलं आहे.