कोविडचा JN1 व्हेरिएंटचा गोव्यात शिरकाव; केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी बोलावली तातडीची बैठक

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 8:23 PM IST

पणजी Vishwajit Rane : जगभरात काही ठिकाणी धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या JN1चा बाधित रुग्ण गोव्यात आढळून आल्याने, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आज सकाळीच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीला गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे (Goa Health Minister Vishwajit Rane) व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सामील झाले होते. राज्यात सध्या ओमिक्रोनचे रुग्ण आढळले असले तरी आरोग्य यंत्रणा त्यासाठी सतर्क झाली आहे. अँटीजंन टेस्टवर भर देण्यात येणार असून पर्यटन राज्य असणाऱ्या गोव्यात कोविडचे सगळे नियम कडकपणे पाळण्यासाठी योग्य ती यंत्रणा सज्ज असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. कोविडच्या नव्या विषाणूचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून जिल्हा रुग्णालयात योग्य ती सुविधा उपलब्ध केल्याचं आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितलं. केंद्राच्या ॲडव्हायझरी प्रमाणे योग्य निर्णय घेणार असल्याचं राणे म्हणाले. सध्या राज्यात कोविडचे 19 संशयित आढळले होते, पण हे सर्व रुग्ण होम आयसोलेशन्स मध्ये असून त्यांच्यावर योग्य ती उपचार चालू असल्याचेही राणे म्हणाले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील एक JN1चा बाधित रुग्ण आढळून आला आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.