Girl dies after falling into drain: भावाला वाचवताना 11 वर्षीय मुलीचा नाल्यात बुडून मृत्यू - 11 वर्षीय मुलीचा नाल्यात बुडून मृत्यू
🎬 Watch Now: Feature Video
सिकंदराबाद (हैदराबाद) : तेलंगणामध्ये पावसादरम्यान एक वेदनादायक घटना घडली आहे. येथे एका 11 वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. ती आपल्या लहान भावासोबत चालत असताना लहान भाऊ नाल्यात पडला. ती आपल्या भावाला वाचवायला गेली. परंतु, तीचा पाण्यामध्ये पडून मृत्यू झाला. येथील कलसीबस्ती येथे शनिवारी नाल्यात पडून मौनिका नावाच्या 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. श्रीनिवास व रेणुका यांची मुलगी मौनिका हा तिचा लहान भाऊ कार्तिकसह आज सकाळी नेहमीप्रमाणे दुधाचे पाकीट घेण्यासाठी किराणा दुकानात गेले होते. मुसळधार पावसामुळे रस्ता तुडुंब भरला होता. त्यामुळे नाल्याला मोठा खड्डा पडला होता. याकडे लक्ष न देता दोघेही चालत होते. त्यावेळी लहान भाऊ नाल्यात पडला. मौनिकाने तिच्या भावाला कसा तरी बाहेर काढण्यात यश मिळवले, पण ती त्यात वाहून गेली.