Dry Fruit Modak : गणेशोत्सवात साखरमुक्त ड्रायफ्रूट मोदकांची मागणी वाढली, साखरेच्या मोदकांकडे पाठ

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 10:04 PM IST

thumbnail

मुंबई Dry Fruit Modak : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला आवडणारं खाद्य म्हणजेच मोदक आहे.  गणेशोत्सवा दरम्यान मोदकाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. पूर्वी खव्याचे, मिठाई पासून बनवलेल्या मोदकांना ग्राहकांकडून मागणी असते. मात्र अलीकडे काही वर्षांपासून मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून मधुमेही रुग्णदेखील चवीनं बाप्पाच्या प्रसादाचा आस्वाद घेऊ लागले आहेत. बाजारात शुगर फ्री ड्रायफ्रूट्स मोदक आले आहेत. खास करून घरगुती गृहिणी शुगर फ्री मोदक बनवून सप्लाय करत असल्याचे दिसत आहे. लॉकडाऊनपासून अनेक गृहिणींनी आपले घरगुती व्यवसाय सुरू केले आहेत. त्यातच ठाण्यात राहणाऱ्या नंदिनी काजरोळकर यांनी शुगर फ्री ड्रायफ्रूट्स मोदक आणि लाडू मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रभर सप्लाय केले आहेत. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.