ETV Bharat / state

वन नेशन वन इलेक्शनवर सुप्रिया सुळे यांची सावध भूमिका; 'हे' कारण देत बोलण्यास दिला नकार - One Nation One Election

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

One Nation One Election : केंद्रीय मंत्रिमंडळानं वन नेशन वन इलेक्शन योजना लागू करण्याचा विचार सध्या सुरू आहे. मात्र वन नेशन वन इलेक्शन योजनेवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वन नेशन वन इलेक्शन योजनेवर बोलण्यास नकार दिला आहे.

One Nation One Election
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

मुंबई One Nation One Election : केंद्रीय मंत्रिमंडळानं वन नेशन वन इलेक्शनचा निर्णय घेतला असून त्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. अद्याप वन नेशन वन इलेक्शन प्रकरणी सरकारनं अद्याप प्रस्तावच दिला नसल्यानं बोलणं योग्य होणार नाही, अशी सावध भूमिका सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.

One Nation One Election
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Reporter)

सुप्रिया सुळेंची सावध भूमिका : प्रस्ताव येत नाही तोपर्यंत बोलणं योग्य नाही, अशी सावध भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वन नेशन वन इलेक्शनवर दिली आहे. "आमची भूमिका ही पक्षाची भूमिका असणार आहे, त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन प्रस्ताव आमच्याकडं आलेला नाही. आम्ही तो पूर्णपणे वाचलेला नाही. मात्र सशक्त लोकशाहीमध्ये सर्व निवडणुका एकत्र कशाप्रकारे घेणार हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकारकडून पूर्ण प्रस्ताव आमच्यापर्यंत पोहोचत नाही, त्यावर बोलणं योग्य नाही," असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच : महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्यावरुन काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. त्यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची भूमिका दोन आठवड्यापूर्वी केली असून आम्ही कोणत्याही प्रकारच्या रेसमध्ये नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्यात वाढलेला भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई विरोधात आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही खंबीरपणे लढणार आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. महाविकास आघाडीत जागा वाटपसंदर्भात अतिशय उत्तम पद्धतीनं चर्चा सुरू आहे. सर्व काही फायनल झाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आपल्या सोबत बोलतील."

आरक्षणाबाबत सरकारकडून फसवणूक : "महाराष्ट्रातील अनेक सामाजाची आरक्षणाबाबत ट्रिपल इंजिनच्या सरकारनं फसवणूक केली. सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला पहिल्यांदा आरक्षण देऊ, अशा पद्धतीने घोषणा केली. गेल्या दहा वर्षापासून यांचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय झालं. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत संसदेत सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आवाज उठवला आहे. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीम आणि भटक्या विमुक्त समाजाला पूर्णपणे भाजपानं आणि त्यांच्या मित्र पक्षांनी फसवलं," असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. निवडणुका आल्या की आरक्षणाचा शब्द देतात आणि सत्तेत बसले की आरक्षणावर चर्चा करत नाही. महाराष्ट्रात एक बोलतात, दिल्लीत एक बोलतात." महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीची तयारी सुरु असून ती सरकार पुरस्कृत आहे, का यावर बोलताना सुळे म्हणल्या की, "एकदा आघाडी होऊ द्या नंतर बघू या कोणकोणत्या आघाडीत कोण आहे, त्यावर आधीच कशाला बोलायचं."

राहुल गांधी यांच्यावरील टीकेला दिलं असं उत्तर : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विषयी भाजपा आणि शिवसेनेतील नेत्यांकडून वादग्रस्त भाषा केली जात आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाले की, "आपला भारत देश आणि महाराष्ट्र संस्कारी आहे. त्यात अशा प्रकारच्या भाषांचा वापर केला जात आहे. राजकारण एका बाजूला मात्र दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचं वक्तव्य केलं जाते. त्यावर सत्ताधाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारे रोष व्यक्त केला जात नाही. कारवाई देखील केली जात नाही, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे," अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

  1. सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सॲप पुन्हा एकदा सुरू; पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार - SUPRIYA SULE NEWS
  2. राष्ट्रवादीच्या बॅनरवर रोहित पवारांचा फोटोच नाही, सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या... - Supriya Sule On Sharad Pawar
  3. उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस वादात आता सुप्रिया सुळेंची उडी, म्हणाल्या, "मला त्यांच्याकडून या अपेक्षा..." - Supriya Sule On Devendra Fadnavis

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.