मुंबई iPhone 16 sale in India : ॲपलनं 9 सप्टेंबर रोजी आयफोन 16 मालिका लॉंच केलीय. आज ॲपलनं भारतात नवीन आयफोनची विक्री सुरू केली आहे. देशातील विविध ॲपलच्या आऊटलेट्सवर फोन खरेदीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून येत आहे. मुंबईच्या BKC मधील कंपनीच्या स्टोअरबाहेर अनेक नागरिक आयफोन 16 खरेदी करण्यासाठी रांगेत उभे आहेत.
#WATCH | Mumbai: People purchase Apple's iPhone as the company began its iPhone 16 series sale in India today
— ANI (@ANI) September 20, 2024
A customer Akshay says, " i came at 6 am. i purchased the iphone 16 pro max. i liked ios 18 and the zoom camera quality has become better now, i came from surat." https://t.co/KZsTgu6wyp pic.twitter.com/93vqlgolQk
ॲपल स्टोअरबाहेर मोठी गर्दी : मुंबईतील बीकेसी येथील ॲपल स्टोअरबाहेर मोठी गर्दी दिसून येत आहे. नवीन आयफोन 16 खरेदी करण्यास नागरिक उत्सुक दिसत आहे. iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max दोन्ही मॉडेल्समध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे डिस्प्ले दिलेले आहेत. ज्याचा आकार Pro मध्ये 6.3 इंच तसंच Pro Max मध्ये 6.9 इंच दिलेला आहे. या फोनमध्ये 120Hz प्रोमोशन डिस्प्ले तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
"मी गेल्या 21 तासांपासून रांगेत उभा आहे. मी काल सकाळी 11 वाजल्यापासून येथे आहे. आज स्टोअरमध्ये प्रवेश करणारा पहिला व्यक्ती असेन. आज मी खूप उत्साही आहे. गेल्या वर्षी मी 17 तास रांगेत उभा होतो'.- उज्ज्वल शाह, ग्राहक
"मी सकाळी 6 वाजता आलोय. मी iPhone 16 Pro Max खरेदी केलाय. मला iOS 18 आवडला असून कॅमेऱ्याची गुणवत्ता आता चांगली झाली आहे. मी फोन खरेदीसाठी सुरतहून आलो आहे." - अक्षय, ग्राहक
दिल्लीतही खेरदीसाठी गर्दी : दिल्लीतील साकेत येथील ॲपल स्टोअरच्या बाहेरही लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलं. iPhone 16 मालिकेत iPhone 16 (बेस मॉडेल), iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max यांचा समावेश आहे. आयफोन 16 प्रो डार्क ब्लॅक टायटॅनियम, ब्राइट व्हाइट टायटॅनियम, नॅचरल टायटॅनियम आणि नवीन डेझर्ट टायटॅनियम यासह आकर्षक रंगांत येतोय. ऑप्टिमाइझ केलेल्या पॉवर मॅनेजमेंट, सर्वोत्तम बॅटरीमुळं आयफोन नागरिकांना आवडल्याचं ग्राहक म्हणाले.
काय आहेत फिचर : फोनची कॅमेरा तितकाच प्रभावी आहे. 48MP फ्यूजन कॅमेरा 2रा-जनरेशन क्वाड-पिक्सेल सेन्सर आणि शून्य शटर लॅगसह योतो. नवीन 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 120mm फोकल लांबीसह 5x टेलीफोटो लेन्स फोटोग्राफिक क्षमता वाढवतात, तर कॅमेरा कंट्रोल परिपूर्ण शॉट कॅप्चर करण्यासाठी पर्याय देतं. व्हिडिओ फ्रंटवर, iPhone 16 Pro 4K120 कॅप्चरला सपोर्ट करतं. डॉल्बी व्हिजनमध्ये फ्रेम-बाय-फ्रेम कलर ग्रेडिंगसह सिनेमॅटिक-क्वालिटी रेकॉर्डिंग सक्षम करतं. डिव्हाइसमध्ये ऑडिओ कॅप्चर देखील आहे.
हे वाचलंत का :