ETV Bharat / state

कोणताही उद्योग राज्याबाहेर गेला नाही, विरोधी पक्षनेत्यांनी अभ्यास करुन बोलावं : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल - CM DCM Slams Vijay Wadettiwar - CM DCM SLAMS VIJAY WADETTIWAR

CM DCM Slams Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जात असल्याची टीका केली. त्यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. विरोधी पक्षनेत्यांनी अभ्यास करुन बोलावं, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना दिला.

CM DCM Slams Vijay Wadettiwar
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2024, 11:34 AM IST

Updated : Sep 20, 2024, 2:37 PM IST

नागपूर CM DCM Slams Vijay Wadettiwar : महाराष्ट्रात येणारा आणखी एक महत्वाचा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यानंतर गुरुवारी संपूर्ण दिवसभर या विषयावर राजकारण रंगलं. या आरोपांना उत्तर देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढं आले. कोणताही अभ्यास न करता विरोधी पक्षनेत्यांनी आरोपांची अक्षरशः राळ उठवली. मात्र, काही तासात त्यांना तोंडघशी पडावं लागलं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर "विरोधकांनी महाराष्ट्राला बदमान करण्याचा उद्योग सुरू केला," असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ते गुरुवारी नागपूर विमानतळावर बोलत होते.

विरोधी पक्षनेत्यांनी अभ्यास करुन बोलावं : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल (Reporter)

नागपूरमध्ये सोलर पॅनलचा प्रकल्प : नागपूरमध्ये सोलर पॅनलचा प्रकल्प येणार होता. या प्रकल्पांतर्गत 18 हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय, प्रशासकीय उदासीनतेमुळे हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचे ते म्हणाले.

CM DCM Slams Vijay Wadettiwar
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Reporter)

खोटं बोल पण रेटून बोल, हेच विरोधकांचं काम : विरोधी पक्षाला आता दुसरं काही काम नाही. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, कालच सेमीकंडक्टरच्या कंपनीचं उद्घाटन केलं. दोन वर्षाच्या कारकीर्दीत 5 लाख कोटींचे एमओयू साइन केले आहेत. त्याचबरोबर स्टील इंडस्ट्री, सोलार, खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहेत. नामांकित कंपन्या येत आहेत, त्यामुळे हे सगळं दिशाभूल करण्याचं काम आणि खोटं नरेटीव पसरवण्याचं काम विरोधी पक्ष करतोय, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

CM DCM Slams Vijay Wadettiwar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Reporter)

राज्याला बदनाम करण्याचे काम विरोधी पक्ष करतोय : "आपल्या राज्याला बदनाम करण्याचं काम विरोधी पक्ष करतोय. अनेक प्रकल्प आपण करतोय आणि पूर्ण केले आहेत. सगळं पॉझिटिव्ह सुरू असताना विरोधकांनी लोकांची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे, असं ते म्हणाले. लोकसभेमध्ये खोटं बोलून त्यांनी मतं घेतली आहेत. हे लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात गेले आहेत. काँग्रेस नेते सुनील केदार लाडकी बहीण योजना बंद करू असं म्हणत आहेत. पण यांच्यावर कोणीही लोक विश्वास ठेवणार नाही. विरोधकांच्या पोटात दुखतं आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जनता त्यांना माफ करणार नाही," असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

विरोधी पक्षनेत्यांना तोंडावर पडावं लागलय : देवेंद्र फडणवीस : "विरोधी पक्षनेत्यांनी अभ्यास करून बोलायला हवं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. वर्तमानपत्रात बातमी आली म्हणून लगेच माहिती न घेता महाराष्ट्राची बदनामी करायची हे आता बंद केलं पाहिजे. आज अक्षरशः विरोधी पक्षनेत्यांना तोंडावर पडावं लागलंय. हा उद्योग बाहेर गेला नाही, असं त्या कंपनीनं खुलासा केला आहे. महाराष्ट्रात कमिटमेंट केलं ते उद्योग उभारणारंच असल्याचा खुलासा कंपनीनं केला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. उद्योगासंदर्भात बातमी करताना पत्रकारांनी सुद्धा त्याची खात्री करून घेतली पाहिजे. अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर किमान त्या कंपनीशी खात्री करून घ्यावी, यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते. विरोधी पक्षनेते यातून बोध घेतील."

राणेंची तक्रार कुणाकडं केली मला माहीत नाही : अजित पवार यांनी कोणाकडं तक्रार केलीय, या बद्दल माहिती नाही. नितेश राणे हे हिंदुत्ववादी असून ते त्यासाठी काम करत आहेत. नितेश राणे बोलतात, त्याचा कधी कधी वेगळा अर्थ निघतो. यासाठी स्वतः नारायण राणे यांनी चर्चा केली आणि मी सुद्धा त्यांच्याशी चर्चा केली, यापुढं काळजी घेतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा :

  1. मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा; विधानसभेतील जागावाटपाची यादी तयार? - Maharashtra Politics
  2. Eknath Shinde Gadchiroli : 'घरी बसून काम करणाऱ्यांपेक्षा मोकळेपणाने बोलणारे चांगले', गडचिरोलीत शिंदेंचा ठाकरेंना चिमटा
  3. CM DCM Delhi Visit : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत अमित शाह यांची घेतली भेट, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा; महिना ठरला
Last Updated : Sep 20, 2024, 2:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.