ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप!, मुंबईच्या राजाची जल्लोषात विसर्जन मिरवणूक, पाहा व्हिडिओ - Mumbai Ganpati Visarjan 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2024, 7:02 PM IST

thumbnail
मुंबईसह लालबागमध्ये गणपती बाप्पा विसर्जन मिरूणूक (ETV BHARAT Reporter)

मुंबई Mumbai Ganpati Visarjan 2024 : मुंबईत आज अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi 2024) दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मोठ-मोठे गणपती विसर्जनासाठी (Ganpati Visarjan) मार्गस्थ झाले आहेत. गणेश गल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत निघाली. मुंबईतील गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी केली होती. या विसर्जन मिरवणुकीतील खास आकर्षण ठरली ती चिमुकली पार्वती. यंदा गणेश गल्लीत उज्जैनमधील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात मुंबईचा राजा विराजमान झाला होता. पांढरे वस्त्र परिधान करून आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून कपाळावर तिसरा डोळा दिसत असलेल्या चिमुकल्या पार्वतीचं नाव रुतवा राकेश सावंत आहे. तसेच या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी 24 हजाराहून अधिक पोलीसांचा फौज फाटा रस्त्यावर उतरला आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.