बेळगाव Brain Surgery News - कणेरी मठातील डॉक्टरांनी बासरीचे वादन करणाऱ्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. दुर्मीळ ट्युमरवर शस्त्रकिराय करून डॉक्टरांनी नवा विक्रम केला. न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजके आणि भूलतज्ज्ञ प्रकाश भारमगौडा यांनी ही शस्त्रक्रिया करून संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले.
शस्त्रक्रिया सुरू असताना रुग्ण आरामात झोपून बासरी वाजवित होता. त्याला कोणताही त्रास जाणवला नाही. सिद्धगिरी रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या डॉक्टरांनी जवळपास ५ तास शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांच्या या टीमनं आजपर्यंत मेंदुच्या १०३ शस्त्रक्रिया केल्या आहेत. सिद्धगिरी रुग्णालय हे क्रॅनियोटॉमी शस्त्रक्रियेसाठीदेखील प्रसिद्ध आहे. कणेरी मठाचे कदसिद्धेश्वर स्वामी यांनी डॉक्टरांचे कौतुक केले.
भूल असतानाही रुग्णानं बासरी कशी वाजविली?डॉ. शिवशंकर मराजके यांनी कर्नाटकमधील बेळगावमध्ये माध्यमांशी बोलताना शस्त्रक्रियेची माहिती दिली. डॉ. मराजके म्हणाले, "सामान्यत: शस्त्रक्रिया सुरू असताना रुग्णाला इंजेक्शन देऊन भूल दिली जाते. मात्र, या शस्त्रक्रियेत शरीराच्या वरील भागापुरती भूल दिली आहे. त्यामुळे रुग्णाला भूल देऊनही तोंड, नाक, डोळे, हात आणि शरीराचे सर्व अवयव काम करीत होते. त्यामुळे आम्ही रुग्णाला बासरी वाजवायला सांगितले. त्यानंतर आम्ही रुग्णाच्या मेंदुतील ट्यूमर यशस्वीपणे काढला. देशात मेंदुवरील अशी कठीण शस्त्रक्रिया केवळ १० ते १२ ठिकाणी होते. त्याचे बिल किमान १० ते १५ लाख रुपये होते. असे असले तरी सिद्धगिरी रुग्णालय आणि संशोधन केंद्रात केवळ १ लाख २५ हजार रुपयात अशी शस्त्रक्रिया होते. कनेरी मठाचे स्वामी यांना रुग्णांबद्दल सहानुभूतीची भावना असल्यानंच हे शक्य झाले."
शस्त्रक्रियेसाठी केवळ १.२५ लाख रुपये- बेळगाव कनेरी मठाचे अदृश्य कादसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, " रुग्ण जागा असताना शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पूर्ण आशिया खंडामध्ये अशी शस्त्रक्रिया कधीही झाली नाही. आमच्या कनेरी मठाच्या सिद्धगिरी रुग्णालयानं असा अनोखा विक्रम केला आहे. रुग्णाचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्याला बासरी वाजवित आणि आईस्क्रीम खात ऑपरेशन करण्याची परवानी दिली. मोलमजुरी आणि गरीब रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी केवळ १.२५ लाख रुपये बिल आकारण्यात येते. त्यामधील ५० टक्के बिल हे आमच्या देणगीतून देण्यात आले. "