Ganeshostav 2023 : मुंबईच्या राजापुढं 'शिवराज्याभिषेक सोहळा'; कार्यकर्त्यांनी रायगड किल्ल्यावरुन आणलीय माती... पहा व्हिडिओ - कार्यकर्त्यांनी रायगड किल्ल्यावरून आणलीय मा
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 20, 2023, 7:56 AM IST
मुंबई : मुंबईकरांसाठी गणेशोत्सव हा अत्यंत महत्त्वाचा (Ganesh Festival 2023) सण असतो. भक्त लाडक्या बाप्पाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत (Mumbai Ganesh Festival) असतात. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ हे गणेश गल्लीतील (Ganesh Galli) मुंबईच्या राजाचे गणेशोत्सव (Ganesh Galli Mumbaicha Raja) मंडळ अतिशय जुने आणि प्रसिद्ध आहे. भव्यतेची परंपरा जपत या मंडळाचे यंदा 97 वे वर्ष आहे. यंदा मुंबईच्या राजाच्या दरबारात हुबेहूब किल्ले रायगडाची प्रतिकृती यंदा साकरण्यात आली आहे. त्याचप्रमाणे किल्ले रायगडावर पार पडलेला शिवराज्याभिषेक सोहळा देखील नेत्रदीपक (Mumbaicha Raja Decoration) आहे. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे माजी पदाधिकारी संदीप सावंत यांनी सांगितले की, हा भव्य रायगडाचा देखावा साकारण्यासाठी दोन अडीच महिने लागले आहे. तसचे रायगड किल्ल्यावरुन रायगडाची माती आणली आहे. ती माती देखील इथं प्रतिकृतीमध्ये भाविकांना पाहण्यासाठी ठेवली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.