पुणे- सध्या जगभरात व्हॅलेंटाईन वीक सुरू असून, या वीकमध्ये विविध डे साजरा केलं जाताहेत. 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे साजरा केलं जाणार आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी तयारी करण्यात आलीय. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तरुण-तरुणी एकमेकांना गुलाबाचं फूल देऊन प्रेम व्यक्त करीत असतात, असं असताना पुण्यातील विवाह नोंदणी कार्यालय येथे याच व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एकाच दिवशी 35 जोडपी लग्न करणार आहेत.
एका दिवशी 35 लग्नांचा स्लॉट उपलब्ध : याबाबत विवाह नोंदणी कार्यालयाचे प्रमुख संगीता जाधव म्हणाल्या की, सध्या विवाह नोंदणी कार्यालयाचे कामकाज हे ऑनलाईन स्वरूपात झाले असून, एका दिवशी 35 लग्नांचा स्लॉट उपलब्ध असतो आणि एका आठवड्यापूर्वीच व्हॅलेंटाईन डे म्हणजेच 14 फेब्रुवारीचे सर्व स्लॉट हे बुक झालेत. या दिवशी आमच्या कार्यालयात 35 लग्न होणार आहेत. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस असतो आणि या दिवशी दरवर्षी मोठ्या संख्येने जोडपी लग्न करीत असतात. यंदादेखील आमच्या कार्यालयात 35 लग्न होणार आहेत, असं यावेळी संगीता जाधव म्हणाल्यात.
रांगोळी काढून लग्नासाठी येणाऱ्या जोडप्यांचे स्वागत करणार : त्या पुढे म्हणाल्या की, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आम्ही आमच्या कार्यालयात रांगोळी काढून लग्नासाठी येणाऱ्या जोडप्यांचे स्वागत करणार आहोत. तसेच येणाऱ्या जोडप्यांना गुलाबाचं फूल आणि चॉकलेट देण्यात येणार आहे. आम्ही इथं सेल्फी पॉइंटदेखील उभे केले असून, त्यालादेखील त्या दिवशी सजावट करण्यात येणार आहे. प्रेमाचं दिवस असणाऱ्या या दिवशी जोडप्यांच प्रेमाने स्वागत करण्यात येणार आहे. सध्या सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन झाली असल्याने एकाच दिवशी 35 स्लॉट उपलब्ध असतात आणि त्यामुळे या दिवशी आम्ही आमच्या कार्यालयात 34 जोडप्यांचे लग्न होणार आहे. जेव्हा ऑफलाईन पद्धत होती तेव्हा आमच्या इथं जवळपास 50 जोडपी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्न करत होती, असंदेखील यावेळी संगीता जाधव यांनी सांगितलंय.
हेही वाचा -