हैदराबाद : दक्षिण कोरियाची ऑटोमेकर कंपनी किआ अनेक सेगमेंटमध्ये नवीन ईव्ही आणण्याची तयारी करत आहे. कंपनीनं नवीन कारबद्दल एक टीझर जारी केला आहे. टीझरमधून कोणत्या कारची माहिती दिली आहे? त्या कधी लॉंच होऊ शकतात? जाला जाणून घेऊया या बातमीतून...
Bold, dynamic and designed for those who move differently.
— Kia Worldwide (@Kia_Worldwide) February 12, 2025
Redefining EV styling with a sleek, distinctive form.
The Kia EV4. Your edge in motion.#Kia #EV #EV4 #MovementThatInspires pic.twitter.com/4flyylESCu
पहिला व्हिडिओ टीझर जारी
किआ नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही आणण्याची तयारी करत आहे. किआ लवकरच तीन नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही आणण्याची तयारी करत आहे. कंपनीनं अलीकडेच सोशल मीडियावर त्यांच्याशी संबंधित पहिला व्हिडिओ टीझर जारी केला आहे. ज्यामध्ये तिन्ही एसयूव्हींबद्दल माहिती मिळत आहे.
काय आहे टीझरमध्ये
किआ ग्लोबलनं सोशल मीडियावर पहिला व्हिडिओ टीझर जारी केला आहे. 36 सेकंदांच्या या व्हिडिओ टीझरमध्ये तिन्ही एसयूव्हीच्या टेललाईट्स, फ्रंट लूक, साइड प्रोफाइल आणि अलॉय व्हील्सची झलक दाखवण्यात आली आहे. या टीझरमध्ये ईव्हीच्या इंटीरियरबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. परंतु त्या प्लॅटफॉर्म बियॉन्ड व्हेईकलवर विकसित केल्या जात आहेत. ज्या अमेरिकेतील लास वेगास येथे झालेल्या सीईएस 2024 मध्ये प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. यावेळी, कंपनीनं त्यांच्या ईव्ही2 ची संकल्पना देखील प्रदर्शित केली.
नवीन ईव्ही कोणत्या नावांनी होणार सादर
जागतिक स्तरावर कंपनीनं जारी केलेल्या व्हिडिओ टीझरमध्ये त्यांच्या नावांची माहिती देण्यात आलेली नाही. परंतु सर्वात लहान एसयूव्ही ईव्ही2 च्या नावानं आणली जाऊ शकते, ज्याची संकल्पना आवृत्ती आधीच प्रदर्शित करण्यात आली आहे. यानंतर, नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही ईव्ही4 आणि पीव्ही5 या नावांनी सादर केल्या जातील.
कसं असेल डिझाइन?
किआ ग्लोबलनं जारी केलेल्या पहिल्या व्हिडिओ टीझरमध्ये तिन्ही एसयूव्हीची झलक दाखवण्यात आली आहे. तथापि, कंपनी किआ 2.0 सारखी उत्पादन आवृत्ती डिझाइन करेल. त्याच धर्तीवर, कंपनीनं प्रथम किआ ईव्ही9 लाँच केली. यानंतर, किआ सायरोस देखील त्याच डिझाइनसह लाँच करण्यात आली.
कधी होणार लॉंच?
किआनं टीझरमध्येच त्यांच्या सादरीकरणाबद्दल माहिती दिली आहे. व्हिडिओनुसार, या तीन इलेक्ट्रिक एसयूव्ही 27 फेब्रुवारी 2025 रोजी जागतिक स्तरावर सादर केल्या जातील. भारतीय वेळेनुसार, या एसयूव्ही 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान सादर केल्या जाऊ शकतात. त्यांच्या सादरीकरणानंतर काही वेळातच, तिन्ही एसयूव्ही अनेक देशांमध्ये लाँच करण्यात येतील. सध्या, या एसयूव्ही भारतीय बाजारात आणण्याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
हे वाचलंत का :