Ganesh Festival 2023 : पाच दिवसांच्या लाडक्या बाप्पाचं पुणेकरांनी केलं विसर्जन; गणपती सोबत गौरीचेही विसर्जन
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 23, 2023, 8:29 PM IST
पुणे Ganesh Festival 2023 : राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विविध कार्यक्रम मनोरंजन यासह देखावे सुद्धा पाहायला भाविक येत आहेत. पुण्यातील मुळा-मुठा नदीमध्ये आज पाच दिवसांच्या (Five days of Ganaraya immersion) गणपतीचे विसर्जन आणि गौरीचे विसर्जन करण्यात आले. (Ganaraya immersion in Pune) अशाप्रकारे पुणेकरांनी मोठ्या उत्साहात पाच दिवसांच्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. (Gauri immersion) उद्यापासून सगळे भाविक सार्वजनिक गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी बाहेर पडत असतात. आपल्या बाप्पाला निरोप देताना सर्वांना दुःखही होतं आणि आनंदही होतो की, बाप्पा आले आणि आपल्याला आशीर्वाद देऊन आज विसर्जित झाले. पुण्यातील नदीपात्रामध्ये महानगरपालिकेकडून विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कृत्रिम विसर्जन हौद देखील बांधण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर दोन दिवसांपासून पुण्यात पाऊस असल्याने वरुण राजाने सुद्धा पुणेकरांवर कृपा केल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर पाच दिवसांच्या गणपतीने आणि गौरीने पुणेकरांचा निरोप घेतलेला आहे. नदीपात्रामध्ये प्रत्येक जण वाजत-गाजत, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत आपापल्या गणेशाचे अतिशय भक्तिभावाने विसर्जन करत आहे.