'लाडकी बहीण योजना' फक्त..; बाळासाहेब थोरातांची पराभावनंतर प्रतिक्रिया - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 24, 2024, 12:04 PM IST
संगमनेर : राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत अनेक बलाढ्य नेत्यांचा पराभव झाला आहे. यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे. "राज्यातील निकाल हा धक्कादायक आहे. या निकालामुळं सामान्य जनतेच्या मनात अनेक शंका आहेत. धर्माचा आणि पैशाचा उपयोग या निवडणुकीत करण्यात आला", असा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुतीवर केलाय. "लाडकी बहीणसारख्या काही योजना फक्त राजकारणासाठी वापरल्यात आल्या आहेत. महायुतीला मिळलेल्या जागा हे त्याचं यश नाही. ओढून-ताणून युक्ती करून महायुतीनं यश मिळवलं. महायुतीनं कोणालाही रोजगार दिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्या आल्याची चौकशी करण्यात आली नाही. अशा अनेक शंका जनतेचा मनात आहेत," असंही थोरात म्हणाले.