ETV Bharat / entertainment

नागराज मंजुळे यांना प्रतिष्ठीत ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ जाहीर, पुण्यात होणार सन्मान सोहळा - SAMATA AWARD TO NAGRAJ MANJULE

अ. भा. महात्मा फुले समता परिषदेतर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ नागराज मंजुळेंना देण्यात येणार आहे. 28 नोव्हेंबरला हा सोहळा पुण्यात पार पडेल.

Nagraj Manjule
नागराज मंजुळे (Nagraj Manjule)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 26, 2024, 6:25 PM IST

पुणे - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी दिला जाणारा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ यावर्षी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रीतेश गवळी यांनी दिली.

महात्मा फुले समता पुरस्कार’च स्वरूप हे रुपये एक लाख, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली येत्या गुरुवार २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० (साडेदहा) वाजता समता भूमी, फुले वाडा, पुणे येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.

यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी लेखक, दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांची निवड करण्यात आली आहे. प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांनी आपल्या चित्रपट सृष्टीतील कार्यातून महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा सामाजिक वारसा विकसित केला आहे. त्यांनी केलेल्या अलौकिक कार्याची दखल घेत त्यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सन २०२४ चा मानाचा ‘समता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येत आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनाच्या निमित्ताने ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना देण्यात येतो. या अगोदर माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरदचंद्र पवार, माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली, खा.शरद यादव, छत्तीसगढ राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्येष्ठ लेखक डॉ.भालचंद्र नेमाडे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, लेखिका अरुंधती रॉय, प्रा.डॉ.मा.गो.माळी, ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, ज्येष्ठ कवी समीक्षक यशवंत मनोहर, डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, कै.प्रा.हरी नरके यांच्यासह अनेक दिग्गजांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे.

हेही वाचा -

'खाशाबा' चित्रपटाच्या हक्काचा वाद न्यायालयात दाखल, नागराज मंजुळे आणि जिओ स्टुडिओ यांना समन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.