मेहकरमध्ये मोठा उलटफेर, सिद्धार्थ खरात यांच्याकडून संजय रायमुलकर यांचा पराभव; विजयानंतर काय म्हणाले? पाहा व्हिडिओ - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video


Published : Nov 24, 2024, 7:07 AM IST
बुलढाणा : मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये (Mehkar Assembly Constituency Result) शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी तीन पंचवार्षिक आमदार राहिलेले महायुतीचे उमेदवार डॉ. संजय रायमुलकर यांचा महाविकास आघाडीच्या पराभव केलाय. मेहकर विधानसभा मतदारसंघ हा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं होमटाऊन आहे. तर या ठिकाणी संजय रायमुलकर हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. परंतु, यावेळेस मंत्रालयीन कामकाजाचा तीस वर्षांचा अनुभव असलेले, राज्य सरकारचे माजी अधिकारी सिद्धार्थ खरात यांनी रायमुलकरांचा पराभव केला आहे. डॉ संजय रायमुलकर यांना मतदारांनी 99423 मतं मिळाली, तर सिद्धार्थ खरात यांना 104242 मतदारांनी पसंती दिली आहे. त्यामुळंच सिद्धार्थ खरात यांचा 4819 मतांनी दणदणीत विजय झालाय. "ही निवडणूक जनतेनं हाती घेतलेली होती. त्यामुळंच माझा विजय झाला", अशी प्रतिक्रिया सिद्धार्थ खरात यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली.