Ram Shobhayatara Nagpur : श्रीरामाच्या शोभायात्रेवर मुस्लिम समुदायाकडून पुष्पवृष्टी; दिला एकतेचा संदेश

By

Published : Mar 30, 2023, 9:45 PM IST

thumbnail

नागपूर: श्रीरामनवमी निमित्ताने ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघत असलेल्या श्रीराम शोभायात्रेवर नागपुरातील मुस्लिम समुदायाकडून दरवर्षी पुष्टवृष्टी केली जाते. मुस्लिम बांधवांनी ही परंपरा यंदाही कायम राखली. पोद्दारेश्वर राम मंदिरातून गुरुवारी सायंकाळी शोभायात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर मुस्लिम बहुल भाग असलेल्या मोमीनपुरातून मार्गस्थ होत असताना मुस्लिम धर्मियांकडून प्रभू राम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीवर फुलांची उधळण करण्यात आली. त्यामुळे नागपूरात सर्वधर्मीय लोकांमध्ये एकोप्याचे भावना असल्याचे चित्र बघायला मिळाले.
 

मंदिराला 100 वर्षे पूर्ण:  मुस्लिम समाजाकडून शोभायात्रेवर पुष्पवृष्टी केल्यानंतर शांततेचे प्रतीक म्हणून कबुतर आकाशात सोडण्यात आले. शोभायात्रेच्या माध्यमातून सर्वधर्मसमभावचा महत्त्वपूर्ण संदेश जगाला दिला जातो. त्यामुळेच शोभायात्रेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे पोद्दारेश्वर राम मंदिराच्या स्थापनेला यंदाच्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. नागपुरात याच कारणाने शतक महोत्सवी वर्ष साजरे केले जाते आहे. या शोभायात्रेत हिंदूसह मुस्लिम समुदाय आणि इतर धर्मांचे नागरिक मोठ्या हिरीरीने सहभाग घेतात. 

रामकृष्ण पोद्दारांचा सेवाभाव: पोद्दारेश्वर राम मंदिर हे केवळ नागपूरचं नाही तर संपूर्ण विदर्भाची सांस्कृतीक आणि धार्मिक ओळख आहे. पोद्दारेश्वर मंदिराला मागील १०० वर्षांचा इतिहास आहे. यानंतर १९५२ साली जमनाधार पोद्दार यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा रामकृष्ण पोद्दार आणि त्यांची मुले श्रीरामांच्या सेवेत कार्यरत आहेत.

हेही वाचा:  Maharashtra Corona Update : कोरोनाच्या ६९४ नव्या रुग्णांची नोंद, राज्य सरकारसह मुंबई पालिका सतर्क

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.